Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकरचा पुढील सामन्यात समावेश होण्याची शक्यता, मुंबईच्या प्रशिक्षकांचा मोठा खुलासा

आयपीएल २०२२ च्या १५ व्या हंगामात मुंबई इंडियन्स गुणतालिकेत एकदम शेवटच्या स्थानावर आहे. मुंबईने आतापर्यंत एकूण आठ सामने गमावले आहेत. मुंबईने आतापर्यंत ९ सामने खेळले असून एका सामन्यात संघाचा विजय झाला आहे. ८ पराभव स्वीकारल्यानंतर मुंबईसाठी प्लेऑफचे दरवाजेही बंद झाले आहेत. तर आता अर्जुन तेंडुलकरला मुंबईच्या टीममध्ये कधी संधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी दिलेल्या माहितीनुसार, टीमसाठी प्रत्येक खेळाडूला एक पर्याय आहे. आम्ही आमचा पहिला विजय मिळवण्यात यशस्वी झालो, त्यामुळे तो आत्मविश्वास यशस्वी मिळवण्यासाठी काही अजून विजयाची गरज आहे. टीममध्ये सर्वोत्तम व्यक्तींचा समावेश करण्याच्या प्रयत्न आम्ही करणार आहोत, असं महेला जयवर्धने म्हणाले.

मुंबई इंडयिन्सच्या आगामी सामन्यासाठी टीममध्ये बदल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई इंडियन्सने स्वत: याचे संकेत दिले होते. सोशल मीडियावरील या व्हिडिओनंतर चाहत्यांनी अर्जुन तेंडुलकर पुढच्या सामन्यात डेब्यू करणार असा प्रश्न उपस्थित केला आहे. गेल्या वर्षापासून २२ वर्षीय अर्जुन तेंडुलकर डेब्यूसाठी प्रतिक्षेत आहे.

आयपीएलमध्ये अर्जुनला टीमने ३० लाख रूपयांना खरेदी केलं होतं. तसेच २०२१ मध्ये त्याला मुंबई इंडियन्सने विकत घेतलं होतं. मात्र, आता कर्णधार रोहित शर्मा अर्जुनचा संघात समावेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे अर्जुन संघात सामील होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा : पोलीस संपुर्ण अभ्यास करूनच गुन्हा दाखल करतात; राणा दाम्पत्यांवरील राजद्रोहाच्या गुन्ह्याबाबत गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया