घरक्रीडाअर्जुन तेंडूलकरचा शुभारंभ

अर्जुन तेंडूलकरचा शुभारंभ

Subscribe

भारताच्या १९ वर्षांखालील संघाकडून खेळताना पहिल्या युवा कसोटी सामन्यात घेतली पहिला बळी

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन याने पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात अप्रतिम कामगिरी करत आपली पहिली विकेट पटकाविली आहे. भारताच्या अंडर १९ संघाकडून खेळताना अर्जुनने ही कामगिरी केली आहे. कोलंबो येथे सुरू झालेल्या भारत आणि श्रीलंका संघांच्या कसोटी सामन्यात अर्जुनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या १९ वर्षांखालील संघाच्या कसोटी सामन्यात खेळताना अर्जुनने स्वत:ची दुसरी तर संघाची तिसरी ओव्हर टाकताना ही विकेट घेतली आहे. अर्जुनने आपल्या सलामीच्या सामन्यात पहिल्या १२ बॉलमध्येच विकेट घेतल्याने त्याचे सर्व क्रिकेट जगतात कौतुक केले जात आहे. अर्जुनने श्रीलंकेचा सलामीवीर कामिल मिश्राला एलबीडब्लु आउट केले. कमिलने ११ बॉलमध्ये दोन फोर लावत ९ रन केले होते. त्याच्या या विकेटने त्याने आंतरराष्ट्रीय सामन्यात आपले विकेटचे खाते खोलले आहे.

सामन्याची सुरूवात श्रीलंकेने टॉस जिंकत बॅटिंगने केली. भारताकडून पहिली ओव्हर अर्जुनने टाकली. त्यात तो काही खास कामगिरी करू शकला नाही. मात्र दुसऱ्याच ओव्हरमध्ये अर्जुनने श्रीलंकेच्यी मिश्राला बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. अर्जुनने आतापर्यंत बऱ्याच दिग्गजांना बॉलिंग केली असून तो लॉर्ड्सच्या मैदानावर नियमित बॉलिंग करणारा बॉलर आहे.त्याने २०१७ च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या पूर्वसंध्येला भारतीय महिला संघालाही बॉलिंग केली आहे. अर्जुनचा हा अनुभव त्याला श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेत फायद्याचा ठरेल हे नक्की. भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी आणि पाच वन डे सामने खेळवले जाणार आहेत. मात्र अर्जुन केवळ कसोटी सामनेच खेळणार असून तो वन-डे मॅचेस खेळणार नाहीये.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -