घरक्रीडाआणि अर्जुनला पाहून विनोद कांबळीच्या डोळ्यात आलं पाणी...

आणि अर्जुनला पाहून विनोद कांबळीच्या डोळ्यात आलं पाणी…

Subscribe

आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर अर्जुननं पहिली विकेट घेतली. ही विकेट घेतल्यानंतर सोशल मीडियावर अर्जुन आणि सचिन तेंडुलकरला शुभेच्छा द्यायला सुरुवात केली. मात्र लक्ष वेधून घेतलं ते सचिनचा जिगरी यार विनोद कांबळीच्या ट्विटनं.

भारताची अंडर १९ टीम आणि श्रीलंकेच्या अंडर १९ टीममध्ये सध्या टेस्ट मॅच सुरु आहे. सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरनं या मॅचमधून डेब्यू केलं असल्यामुळं सध्या ही मॅच चर्चेचा विषय बनली आहे. आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर अर्जुननं पहिली विकेट घेतली. ही विकेट घेतल्यानंतर सोशल मीडियावर अर्जुन आणि सचिन तेंडुलकरला शुभेच्छा द्यायला सुरुवात केली. मात्र लक्ष वेधून घेतलं ते सचिनचा जिगरी यार विनोद कांबळीच्या ट्विटनं.

विनोद कांबळी झाला भावूक

अर्जुननं घेतलेल्या पहिल्या विकेटवर त्याच्या वडिलांचा बेस्ट फ्रेंड विनोद कांबळी प्रचंड भावूक झाला. आपला आनंद व्यक्त करत त्यानं अर्जुनसाठी एक ट्विट केलं. यामध्ये त्यानं अर्जुनसाठी भावनिक संदेश लिहिला आहे. ‘हे बघितल्यानंतर माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. मी त्याला मोठं होताना बघितलं आहे आणि या खेळासाठी त्यानं केलेली मेहनतही मी पाहिली आहे. अर्जुन तेंडुलकर यापेक्षा अधिक मी तुझ्यासाठी आनंदी असूच शकत नाही. ही तर फक्त सुरुवात आहे. घेतलेल्या पहिल्या विकेटचा आनंद घे.’ अशा स्वरुपात विनोदनं आपल्या भावना मांडल्या.

- Advertisement -

सचिन आणि विनोद लहानपणीपासून मित्र

सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी हे लहानपणापासूनच मित्र आहेत. काही वर्षांपूर्वी दोघांमध्ये काही काळासाठी दुरावा निर्माण झाला होता. सचिनची इच्छा असती तर आपलं करिअर जास्त काळ राहिलं असतं असं वक्तव्य विनोदनं एका रियालिटी शो मध्ये केलं होतं. या वक्तव्यामुळं सचिन दुखावला गेला होता. त्यामुळंच सचिननं २०१३ साली निवृत्त होतानाही विनोद कांबळीच्या नावाचा उल्लेखही केला नव्हता. यानंतर आठ वर्षांनी २०१७ मध्ये एका पुस्तकाच्या उद्घाटनाप्रसंगी त्या दोघांमधील मतभेद दूर झाल्याचं सांगितलं. आपण पुन्हा एकत्र आल्याचा आनंद असल्याचंही त्यानं म्हटलं होतं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -