आर्सेनालच्या मुख्य प्रशिक्षकांना करोनाची लागण

चेल्सीचा एक खेळाडू करोनाच्या चाचणीमध्ये पॉझिटिव्ह झाला आहे.

arsenal team
आर्सेनालच्या मुख्य प्रशिक्षकांना करोनाची लागण

जगभरात करोना दिवसेंदिवस फोफावत चालला आहे. करोनाचा प्रादुर्भाव आता खेळाडूंवर पण होऊ लागला आहे. आर्सेनाल या फुटबॉल क्लबच्या मुख्य प्रशिक्षकांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. याबाबतची माहिती एएनआय या न्यूज एजेंसीने दिली आहे. क्लबच्या ज्या खेळाडूंचा संबंध प्रशिक्षकांशी आला आहे त्यांची वैद्यकिय चाचणी केली जाणार आहे.

दरम्यान, चेल्सीच्या एका खेळाडूला देखील करोनाची लागण झाली आहे. याबाबतची माहिती एएनआय या न्यूज एजेंसीने दिली आहे. आतापर्यंत १,२५,२८८ लोकांना करोनाची लागण झाली आहे. यामध्ये ४,६१४ जणांचा मृत्यू झाला आहे. करोनाने आतापर्यंत ११८ देशांमध्ये शिरकाव केला आहे.


हेही वाचा – इराणमधून आज २०० भारतीयांना मायदेशात आणणार