घर क्रीडा Neeraj Chopra : अर्शद नदीम आणि नीरज चोप्राचे 'असे'ही ऑलिम्पिक कनेक्शन, त्यावेळी घडले होते...

Neeraj Chopra : अर्शद नदीम आणि नीरज चोप्राचे ‘असे’ही ऑलिम्पिक कनेक्शन, त्यावेळी घडले होते…

Subscribe

Neeraj Chopra : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) इतिहास रचला आहे. त्याने हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे येथे पार पडलेल्या World Athletics चॅम्पियनशिपमध्ये नीरज चोप्राने 88.17 मीटर भालाफेक करत भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले आहे. अंतिम फेरीत पाकिस्तानच्या अर्शद नदीमचा पराभव करून नीरज चोप्रा चॅम्पियन बनला. सामन्यानंतर नीरज चोप्राने अर्शद नदीमला फोटोसाठी बोलावून पुन्हा एकदा आपल्या खास स्टाइलने चाहत्यांची मने जिंकली. नीरज चोप्राच्या या दिलदारपणाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. दरम्यान, 2021 टोकियो ऑलिम्पिकदरम्यान अर्शद नदीमच्या (Arshad Nadeem) एका चुकीमुळे भारत-पाकिस्तान यांच्यात वादाची ठिणगी पडली होती, परंतु नीरज चोप्राने अर्शद नदीमची बाजू घेत त्याचा बचाव केला होता. (Arshad Nadeem and Neeraj Chopras such Olympic connection happened at that time)

हेही वाचा – Neeraj Chopra World Champion : फोटो सेशनला अर्शद नदीमला बोलावून ‘गोल्डन बॉय’ने जिंकली मने

- Advertisement -

ऑगस्ट 2021मध्ये पार पडलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने ऐतिहासिक कामगिरी करताना भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले होते. त्याने पहिल्याच प्रयत्नात 87.03 मीटर अंतराची नोंद केली तर, दुसऱ्या प्रयत्नात कामगिरीत आणखीच सुधारणा करत 87.58 मीटर लांब भाला फेकला होता. परंतु, पहिल्या प्रयत्नापूर्वी नीरजला त्याचा भाला शोधावा लागल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. नीरजचा भाला पाकिस्तानी खेळाडू अर्शद नदीमच्या हातात होता आणि पहिल्या प्रयत्नापूर्वी नीरजला भाला नदीमच्या हातून काढून घ्यावा लागल्याचे या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत होते. याशिवाय नीरजनेही याबाबत वक्त्वय केलं होतं. त्यामुळे भारतीय चाहत्यांकडून अर्शद नदीमवर तसेच पाकिस्तावर आरोप करण्यास सुरूवात झाली होती. परंतु लोक माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढून भारत आणि पाकिस्तानमधील तेढ वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचे नीरज चोप्राने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करत म्हटले होते.

हेही वाचा – Neeraj Chopra ने इतिहास रचला, World Athletics चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय

छोट्याशा गोष्टीचा आता मोठा मुद्दा बनवण्यात आला

- Advertisement -

नीरज चोप्राने ट्वीट केलेल्या व्हिडीओत म्हटले की, चाहत्यांनी मला दिलेल्या पाठिंब्यासाठी आणि माझ्या यशासाठी केलेल्या प्रार्थनेसाठी मी तुमचे खूप आभार मानतो. मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. सध्या एका मुद्द्यावर खूप चर्चा सुरू आहे. ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीच्या पहिल्या प्रयत्नापूर्वी मला पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीमकडून माझा भाला घ्यावा लागल्याचे मी एका मुलाखतीत सांगितले. पण या छोट्याशा गोष्टीचा आता मोठा मुद्दा बनवण्यात येत आहे, असे नीरजने व्हिडिओत म्हटले होते.

हेही वाचा – ऐतिहासिक कामगिरीबद्दल ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रावर शुभेच्छांचा वर्षाव

खेळ सगळ्यांना एकत्र राहायला शिकवतो  

नीरज चोप्राने अर्शद नदीमची बाजू घेताना म्हटले होते की, स्पर्धेपूर्वी आम्ही आमचा भाला एका जागी ठेवतो. परंतु, तो भाला स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वच भालाफेकपटूंना वापरायची परवानगी असते. त्यामुळे पाकिस्तानी भालाफेकपटूने कोणतीही चूक केली नाही. मी माझ्या प्रयत्नापूर्वी माझा भाला त्याच्याकडून मागून घेतला. ही फारच छोटी गोष्ट आहे. परंतु, काही लोक त्याचा मोठा मुद्दा बनवण्याचा प्रयत्न करत असल्याने मला दुःख होत आहे. माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढू नका, अशी विनंती करताना नीरज चोप्राने म्हटले होते की, खेळ सगळ्यांना एकत्र राहायला शिकवताे. आम्ही सगळे भालाफेकपटू मिळून मिसळून राहतो, असेही त्याने म्हटले होते.

- Advertisment -