घरक्रीडाइंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यांत अर्शदीप सिंगचे पदार्पण

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यांत अर्शदीप सिंगचे पदार्पण

Subscribe

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला टी-२० सामना खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करत आहे. परंतु इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यांमध्ये वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने पदार्पण केलं आहे. हा त्याचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना असणार आहे. रोहित शर्माच्या हस्ते अर्शदीप सिंगला कॅप देण्यात आली आहे.

- Advertisement -

पंजाब किंग्जकडून खेळणारा अर्शदीप सिंग या हंगामात चांगलाच चमकला. त्याने आतापर्यंत १३ सामन्यांत दहा विकेट्स घेतल्या आहेत. पहिल्या टी-२० सामन्यात कॅप्टन जोस बटलर, जेसन रॉय, लियाम लिव्हिंगस्टोनसारखे खेळाडू इंग्लंड संघात आहेत. तर भारतीय संघात विराट कोहली, श्रेयस अय्यर, जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा आणि ऋषभ यांच्या नावांचा समावेश नसून दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक यांचा नावाचा समावेश आहे.

कसे असणार दोन्ही प्लेईंग इलेव्हन संघ –

भारतीय संघ : रोहित शर्मा, ईशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, युजवेंद्र चहल.

- Advertisement -

इंग्लंड संघ : जेसन रॉय, जोस बटलर, डेविड मलान, मोईन अली, लियाम लिविंगस्टोन, हैरी ब्रुक, सैम करेन, क्रिस जॉर्डन, टाइमल मिल्स, रीस टॉपली, मैथ्यू पार्किंसन.


हेही वाचा : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -