घरक्रीडातब्बल 1.8 कोटी लोकांनी पाहिला भारत-पाकिस्तानचा लाइव्ह सामना, एक नवा विक्रम

तब्बल 1.8 कोटी लोकांनी पाहिला भारत-पाकिस्तानचा लाइव्ह सामना, एक नवा विक्रम

Subscribe

भारत आणि पाकिस्तान यांच्यात काल टी-20 विश्वचषकाचा महामुकाबला पहायला मिळाला. यावेळी 4 गडी राखत भारताने पाकिस्तानचा पराभव केला. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीनं हार्दिक पांड्याला सोबत घेऊन भारताच्या विजयाचा पाया रचला. परंतु हा सामना सुरू असताना तब्बल 1.8 कोटी लोकांनी भारत-पाकिस्तानचा लाइव्ह सामना पाहिला. हा एक नवा विक्रम आहे.

भारतात हा सामना स्टार स्पोर्ट्सवर प्रसारित करण्यात आला होता. डिजिटल प्लॅटफॉर्म हॉटस्टारचे आकडे कंपनीकडून प्रसिद्ध करण्यात आले आहेत. डिस्ने प्लस हॉटस्टारवर 1. 8 कोटी लोकांनी भारत-पाकिस्तान सामना पाहिला आहे. जेव्हा भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारनं सामन्याचा पहिला चेंडू टाकला, त्यावेळी 36 लाख लोक पाहत होते. तर, पाकिस्तानचा डाव संपला तेव्हा हा आकडा 1.1 कोटी इतका होता. तसेच भारतीय संघ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरली तेव्हा 40 लाख लोक लाइव्ह स्ट्रीमिंग पाहत होते.

- Advertisement -

दरम्यान, आशिया चषक 2022 स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेला सामना तब्बल 1.4 कोटी लोकांनी डिस्ने प्लस हॉटस्टार लाईव्ह पाहिला होता.

रनमशीन विराट कोहलीने उत्कृष्ट कामगिरी करत 53 चेंडूत 83 धावा काढल्या. विराट कोहलीनं सुरुवातीला संयमी खेळी केली. त्यानंतर कोहलीच्या विजयाच्या फटाकेबाजीला सुरूवात झाली. अखेरच्या ओव्हरमध्ये फटकेबाजी करत विराटने भारताला विजय मिळवून दिला. या उत्तुंग खेळीनंतर विराटचं सोशल मिडियावर कौतुक करण्यात आलं.

- Advertisement -

हेही वाचा : पाकिस्तानची ‘ही’ एक चूक अन् भारताला मिळाला ‘विराट’


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -