Eco friendly bappa Competition
घर क्रीडा बुमराहा 'बाबा' होताच सोशल मीडियाद्वारे सांगितले बाळाचे नाव

बुमराहा ‘बाबा’ होताच सोशल मीडियाद्वारे सांगितले बाळाचे नाव

Subscribe

मुंबई : भारतीय क्रिकेट टीममधील स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा हा बाबा झाला आहे. बुमराहची पत्नी संजना गणेशन हिने आज सकाळी मुलाला जन्म दिला आहे. यानंतर बुमरा आणि संजना हे आता आई-बाबा झाले आहेत. बुमराने ही आनंदाची बातमी स्वत: ट्वीटर आणि इन्स्टाग्रामवर माहिती दिली आहे.

सध्या आशिया कप श्रीलंकेत सुरू आहे. बुमराह हा 3 सप्टेंबरला आशिया कप सोडून भारतात आल्यानंतर सर्वांना मोठे आश्चर्य वाटले होते. पण आज बुमराने बाबा झाल्याची माहिती दिल्यानंतर सर्व चर्चांना पूर्णविराम लागला आहे. बुमराने आनंदाची बातमी शेअकर केल्यानंतर सोशल मीडियावर सर्वजण शुभेच्छांचा वर्षावर करत आहेत.

बुमराने सोशल मीडियावर दिली आनंदाची बातमी

- Advertisement -

बुमराने ट्वीटमध्ये लिहिले की, “आमचे छोटे कुटुंब आता थोडे मोझे झाले आहे. आज सकाली आमच्या घरी अंगद जसप्रीत बुमराचे आगमन झाले आहे. आमच्या नवीन आयुष्याला सुरुवात झाली आहे.”

- Advertisement -

हेही वाचा – रंगारंग कार्यक्रमाने आशिया कपला सुरुवात; पहिली लढत पाक विरुद्ध नेपाळ

आशिया कपमधून माघार

बुमराने आयर्लंडविरूद्धच्या टी – 20 मालिकेमध्ये भारतीय टीमची कमान सांभाळली होती. यानंतर आशिया कप खेडण्यासाठी श्रीलंकेला होता. पण बुमराह हा रविवारी मुंबईला आला. वैयक्ती कारणामुळे बुमराने आशिया कपमधून माघार घेतल्याचे सांगतले होते. पण आज बुमराने बाबा झाल्याची बातमी दिल्यानंतर चाहत्यांनी आनंद व्यक्त केला.

- Advertisment -