Ashes 2021-22 : इंग्लंडच्या अडचणीत वाढ, पाचव्या कसोटी सामन्यातून ३ खेळाडू बाहेर?

Ashes 2021-22 : england team trouble in ashes jonny bairstow ben stokes and jos buttler out of 5th test against australia
Ashes 2021-22 : इंग्लंडच्या अडचणीत वाढ, पाचव्या कसोटी सामन्यातून ३ खेळाडू बाहेर?

ऑस्ट्रेल्या आणि इग्लंगडमध्ये एशेज सिरीजमधील चौथा कसोटी सामना सिडनीच्या क्रिकेट मैदानावर खेळवण्यात येणार आहे. इंग्लंडच्या संघाने मालिकेत मागच्या तुलनेत चांगले प्रदर्शन केले आहे. इंग्लंडच्या फलंदाज एशेजमध्ये अपयशी ठरले असून संघ मागील ७ डावांत ऑलआउट झाला आहे. तिसऱ्या सामन्यातील दुसऱ्या डावात इंग्लंडने फक्त ६८ धावा केल्या आहेत. आता पाचव्या कसोटी सामन्यापूर्वीच इग्लंडच्या संघापुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत. इंग्लडमधील जोस बटलर, बेन स्टोक्स आणि पहिल्या डावात शतकीय खेळी करणारा जॉनी बेयरस्टो दुखापतीमुळे संघातून बाहेर होण्याची शक्यता आहे.

बेन स्टोक्सने चौथ्या सामन्यात पहिल्या डावात ६६ धावा केल्या आहेत. तेव्हाही तो दुखापतग्रस्त होता. बेन स्टोक्सच्या दुखापतीमुळे तो पाचव्या सामन्यातून बाहेर होण्याची शक्यता आहे. तब्बल पाच महिन्यांनतर संघात परतलेल्या बेन स्टोक्सबाबत इंग्लंडच्या बोर्डाला कोणताही धोका पत्करायचा नाही. यामुळे त्याला पाचव्या कसोटी सामन्यातून बाहेर ठेवण्यात येण्याची शक्यता आहे.

इग्लंडच्या संघाचा अष्टपैलू खेळाडू आणि यष्टीरक्षक जोस बटलर याला गुरुवारी झालेल्या सामन्यात विकेटकीपिंगदरम्यान डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आहे. या जखमेमुळे त्याला गोलंदाजी करता आली नाही तसेच ८ चेंडू खेळून खातं न खोलताच पुन्हा परतला होता. त्याच्या जागी ओली पोप विकेटकीपिंग करत आहे.

इंग्लडने चौथ्या कसोटी सामन्यात ३६ धावा काढल्या होत्या तर ४ गडी गमावले होते. यानंतर जॉनी बेयरस्टोने शतकीय खेळी करुन संघाला उभारी दिली. या शानदार खेळीदरम्यान बेयरस्टोला दुखापत झाली आहे. दुखापत झाली असतानाही त्याने खेळण्याचा निर्णय घेतला आणि १५९ चेंडूमध्ये ११३ धावा केल्या आहेत. चालू एशेज सिरीजमध्ये शतकीय खेळी करणारा इंग्लडचा पहिला खेळाडू बेयरस्टो आहे. तसेच बेयरस्टोच्या कारकिर्दीतील हे ७ वे शतक आहे.

ऑस्ट्रेलिया सिरीजमध्ये पहिल्या तीन सामने जिंकली असून एशेज ट्रॉफी आपल्या नावे करुन मोकळी झाली आहे. इंग्लडंचे प्रदर्शन या एशेज सिरीजमध्ये खराब राहिले आहे. यामुळे ऑस्ट्रेलियाने आपली पकड मजबूत केली आहे.


हेही वाचा : महिला विभागीय क्रिकेट स्पर्धेत नाशिक संघाचे वर्चस्व