घरक्रीडाAshes 2021 AUS vs ENG : कांगारूच्या संघासमोर इंग्लिश संघ गारद; पिंक-बॉल...

Ashes 2021 AUS vs ENG : कांगारूच्या संघासमोर इंग्लिश संघ गारद; पिंक-बॉल कसोटीत ऑस्ट्रेलियाचा मोठा विजय

Subscribe

सध्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये ॲशेस मालिकेचा थरार सुरू आहे

सध्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये ॲशेस मालिकेचा थरार सुरू आहे. पहिल्या सामन्यात मिळवलेल्या अभुतपूर्व यशानंतर यजमान कांगारूच्या संघाने दुसऱ्या सामन्यात देखील मोठा विजय मिळवून इंग्लिश संघाचा सलग दुसरा पराभव केला. या विजयासोबत ऑस्ट्रेलियाच्या संघाने मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान, पिंक-बॉल कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ४७३ धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लिश संघ अवघ्या १९२ धावावंर सर्वबाद झाला. सोबतच ऑस्ट्रेलियन संघाने २७५ धावांच्या मोठ्या विजयाने विजयरथ चालू ठेवला आहे. आता पाच सामन्यांच्या मालिकेत यजमान संघाने २-० अशी आघाडी घेतली आहे. लक्षणीय बाब म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या संघाने दुसऱ्या सामन्यातील विजय स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वात मिळवला आहे.

दरम्यान, दुसऱ्या डावात इंग्लंडची फलंदाजी पूर्णपणे अपयशी ठरली. इंग्लंडकडून हसीब हमीद डावाच्या दुसऱ्या षटकातच तंबूत परतला. इंग्लंडकडून क्रिस वोक्सने सर्वाधिक ४४ धावा केल्या, तर कर्णधार जो रूट केवळ २४ धावा करून तिसऱ्या दिवसाच्या अखेरीस मिचेल स्टार्कचा शिकार झाला होता. ऑस्ट्रेलियाकडून युवा गोलंदाज झाय रिचर्सडनने सर्वाधिक ५ बळी पटकावले, लक्षणीय बाब म्हणजे त्याचा हा त्याच्या कारकिर्दीतील दुसराच कसोटी सामना होता.

- Advertisement -

ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या सामन्यात २७५ धावांनी मोठा विजय मिळवला आणि या विजयाचा हिरो मार्नस लाबुशाने ठरला. त्याने ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात शानदार शतक झळकावले होते. दरम्यान यजमान संघाने आपला पहिला डाव ४७३ धावांवर घोषित केला होता. ज्यामध्ये मार्नस लाबुशानेच्या शतकीय खेळीव्यतिरिक्त कर्णधार स्टीव्ह स्मिथच्या ९३ आणि डेविड वॉर्नरच्या ९५ धावांचा समावेश होता.

- Advertisement -

तर, दुसऱ्या डावात इंग्लंडकडून जोस बटलर आणि क्रिस वोक्सने काही वेळ संघर्ष केला मात्र त्यांचा संघर्ष अयशस्वी ठरला. पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवानंतर इंग्लिश संघात वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांचा समावेश करण्यात आला होता. मात्र तरी देखील यजमान संघाचा विजयरथ रोखण्यात इंग्लिश संघाला यश आले नाही.


हे ही वाचा: http://U-19 World Cup 2022 : आगामी विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा; यश धूल करणार नेतृत्व


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -