घरक्रीडाAshes Series 2021-22 : बॉक्सिंग डे कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन संघात स्कॉट बोलंडचा समावेश;...

Ashes Series 2021-22 : बॉक्सिंग डे कसोटीसाठी ऑस्ट्रेलियन संघात स्कॉट बोलंडचा समावेश; हा स्टार गोलंदाज होऊ शकतो बाहेर

Subscribe

ॲशेस मालिकेतील तिसऱ्या सामन्यासाठी यजमान कांगारूच्या संघात स्कॉट बोलंडचा समावेश करण्यात आला आहे

ॲशेस मालिकेतील तिसऱ्या सामन्यासाठी यजमान कांगारूच्या संघात स्कॉट बोलंडचा समावेश करण्यात आला आहे. बोलंड तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या संघाचा हिस्सा असू शकतो. त्याला मिचेल स्टार्क किंवा जोश हेजलवुडच्या जागी संधी मिळू शकते. यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघाने ॲशेस मालिकेच्या शेवटच्या तीन सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा करण्यात आली होती आणि सुरूवातीच्या दोन सामन्यात खेळलेल्या संघात कोणताच बदल केला नव्हता. मात्र बोलंड ॲडले़डमध्ये संघासोबत सराव करत होता. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या निवेदनात म्हटले की, दुसऱ्या कसोटीतील विजयानंतर वैद्यकीय पथकाने वेगवान गोलंदाजांची फिटनेसबाबत तपासणी केली असून स्कॉट बोलंडचा संघात समावेश करण्यात आला आहे.

दरम्यान, बोलंडने २०१८-१९ या कालावधीत मार्स शेफील्ड शील्डमध्ये ‘प्लेयर ऑफ द ईयर’ चा किताब आपल्या नावावर केला होता. तर या वर्षी तो शानदार लयनुसार खेळत आहे आणि विक्टोरिया कडून खेळताना त्याने दोन सामन्यांत १५ बळी घेतले होते. ब्रिस्बेनमध्ये इंग्लंड लायन्सविरुद्धच्या सामन्यातही त्याला खेळण्याची संधी मिळाली आणि त्यानंतर तो ऑस्ट्रेलियन संघाशी जोडला गेला.

- Advertisement -

हेजलवुड किंवा स्टार्क होऊ शकतो बाहेर

दरम्यान, मालिकेतील तिसऱ्या सामन्यात कांगारूच्या संघाचे प्रमुख वेगवान गोलंदाज जोश हेजलवुड किंवा मिचेल स्टार्क यांतील एक खेळाडू संघातून बाहेर होऊ शकतो. हेजलवुडला मालिकेतील दुसरा सामना सुरू होण्याच्या पूर्वसंध्येला दुखापत झाली होती, त्यामुळे त्याच्या फिटनेसबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे त्याच्या जागेवर बोलंडला संधी मिळू शकते. तर हेजलवुड फिट झाला तर स्टार्कला आराम दिला जाऊ शकतो. स्टार्क मालिकेतील दोन्ही सामने खेळला आहे आणि पाच सामन्यांच्या मालिकेत वेगवान गोलंदाजांना आराम देणे गरजेचे आहे.

- Advertisement -

हे ही वाचा: http://R Ashwin : २०१८ मध्ये क्रिकेट सोडण्याचा विचार होता; संघ व्यवस्थापनाच्या वृत्तीवर नाराज अश्विनचा मोठा खुलासा


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -