घरक्रीडाAshes 1st Test 3rd day : मलान-रूटच्या अर्धशतकांनी इंग्लंडचा डाव सावरला; इंग्लिश...

Ashes 1st Test 3rd day : मलान-रूटच्या अर्धशतकांनी इंग्लंडचा डाव सावरला; इंग्लिश संघ ऑस्ट्रेलियापेक्षा ५८ धावांनी पिछाडीवर

Subscribe

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये ब्रिस्बेनमध्ये होत असलेल्या पहिल्या सामन्यातील तिसरा दिवस इंग्लंडच्या फलंदाजांच्या नावावर राहिला

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये ब्रिस्बेनमध्ये होत असलेल्या पहिल्या सामन्यातील तिसरा दिवस इंग्लंडच्या फलंदाजांच्या नावावर राहिला. पहिल्या डावात स्वस्तात माघारी परतलेल्या इंग्लिश खेळाडूंनी दुसऱ्या डावात चमकदार खेळी केली. तिसऱ्या दिवसाअखेर इंग्लंडने आपल्या दुसऱ्या डावात २ गडी गमावून २२० धावा उभारल्या. कर्णधार जो रूट आणि डेविड मलान हे अर्धशतकीय खेळी करून नाबाद राहिले आहेत. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या संघाने अद्यापही ५८ धावांची आघाडी ठेवली आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाने त्यांच्या पहिल्या डावात ४२५ धावा केल्या होत्या आणि त्यांना इंग्लंडच्या पहिल्या डावाच्या आधारावर २७८ धावांची आघाडी मिळाली.

रूट आणि मलानची नाबाद अर्धशतकीय खेळी

तिसऱ्या दिवसाअखेर इंग्लंडचा कर्णधार जो रूट ४६ धावांवर नाबाद राहिला आहे. त्याने त्याच्या खेळीत आतापर्यंत १० चौकार मारले आहेत. तर त्याची साथ डेविड मलान देत आहे. त्यानेदेखील त्याच्या खेळीत १० चौकार लगावले आहेत. दरम्यान रूट आणि मलान याच्यांत तिसऱ्या दिवसाअखेर तिसऱ्या बळीसाठी १५९ धावांची भागीदारी झाली आहे.

- Advertisement -

जो रूटचा नवा विक्रम

इंग्लडचा कर्णधार जो रूटने कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. तो एका वर्षात सर्वाधिक धावा बनवणारा इंग्लिश खेळाडू बनला आहे. याबाबतीत त्याने मायकल वॉन जॉनी बेयरस्टोसोबतच काही दिग्गज खेळाडूंना मागे टाकले आहे. त्याने एका वर्षात सर्वाधिक १४८२ धावा करून मायकल वॉनचा विक्रम मोडला आहे. वॉनने २००२ मध्ये १४८१ धावा केल्या होत्या. तर या यादीत तिसऱ्या क्रमांकावरही रूटच आहे त्याने २०१६ मध्ये १४७७ धावा केल्या होत्या. तर चौथ्या स्थानावर जॉनी बेयरस्टो आहे त्याने २०१६ मध्ये १४७० धावा केल्या होत्या.

- Advertisement -

ऑस्ट्रेलियाने बनवल्या ४२५ धावा

इंग्लंडच्या डावापूर्वी कांगारूच्या संघाने सामन्यातील त्यांच्या पहिल्या डावात ४२५ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून ट्रेव्हिस हेडने सर्वाधिक १५२ धावांची खेळी केली. त्याच्या पाठोपाठ डेविड वॉर्नर ९४ तर मार्नस लाबुशाने ७४ धावा करून बाद झाला. तर शेवटच्या फळीतील मिचेल स्टार्कने ३५ धावांची साजेशी खेळी केली. या सर्व फलंदाजांच्या खेळीच्या बदल्यात ऑस्ट्रेलियन संघाने ४०० चा आकडा पार केला आणि आपल्या पहिल्या डावात ४२५ धावा करण्यात यश मिळवले. तर ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स १-१ बळी घेण्यात यशस्वी झाले. स्टार्कने सलामीवीर फलंदाज हसीब हमीदला २७ धावांवर बाद केले तर कर्णधार पॅट कमिन्सने १३ धावांवर रोरी बर्न्सला माघारी पाठवले. या दोन गोलंदाजांव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाच्या कोणत्याच गोलंदाजाला बळी घेण्यात यश आले नाही.


हे ही वाचा: http://Asia Under 19 world Cup 2021 : आशियाई चषकासाठी भारतीय संघाची घोषणा; जुन्नरच्या सुपूत्रालाही मिळाली संधी


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -