घरक्रीडाAshes Series 2021 : ऑस्ट्रेलियन संघाला मोठा झटका; एडिलेड पिंक बॉल सामन्यातून...

Ashes Series 2021 : ऑस्ट्रेलियन संघाला मोठा झटका; एडिलेड पिंक बॉल सामन्यातून जोश हेजलवुड बाहेर

Subscribe

ॲशेस मालिकेदरम्यान खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या सामन्याच्या पूर्वसंध्येलाच ऑस्ट्रेलियाच्या संघाला झटका बसला आहे

ॲशेस मालिकेदरम्यान खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या सामन्याच्या पूर्वसंध्येलाच ऑस्ट्रेलियाच्या संघाला झटका बसला आहे. कांगारूच्या संघाचा स्टार गोलंदाज जोश हेजलवुड एडिलेडमध्ये होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यातून बाहेर गेला आहे. तो दुखापतग्रस्त असल्याकारणाने १६ डिसेंबरला सुरू होणाऱ्या पिंक बॉल दुसऱ्या कसोटी सामन्यात संघाचा भाग नसणार आहे. माहितीनुसार त्याच्या पाठीला दुखापत झाल्यामुळे त्याने दुसऱ्या सामन्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे. तर त्याच्या जागेवर झाय रिचर्डसनचा संघात समावेश होण्याची शक्यता आहे. लक्षणीय बाब म्हणजे क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून अद्यापही जोश हेजलवुडच्या बदलीबाबत माहिती देण्यात आली नाही.

माहितीनुसार, हेजलवुड त्याच्या घरी सिडनीला परतला आहे. तो ज्या फ्लाइटमधून घरी परतला त्या फ्लाइटमध्ये त्याच्या व्यतिरिक्त कोणीही नव्हते. त्याने कर्णधार पॅट कमिन्सला दुखापतीबाबत यापूर्वीच माहिती दिली. ब्रिस्बेनमधील पहिला कसोटी सामना झाल्यानंतर कर्णधार कमिन्सने सांगितले होते की, हेजलवुड दुखापतग्रस्त आहे आणि त्याच्या दुखापतीवर उपचार सुरू आहेत. तो पाठीच्या दुखापतीमुळे ग्रस्त आहे.

- Advertisement -

ब्रिस्बेन येथे खेळल्या गेलेल्या ॲशेस मालिकेतील पहिल्या सामन्यात जोश हेजलवुडने शानदार गोलंदाजी करताना पहिल्या डावात दोन बळी घेतले होते. त्याने दोन्हीही गडी ४२ धावांत बाद केले. यानंतर दुसऱ्या डावात त्याने एक बळी घेतला यानुसार त्याने पहिल्या कसोटीत एकूण ३ बळी पटकावले. त्याने त्याच्या कसोटी कारकिर्दीत ऑस्ट्रेलियासाठी आतापर्यंत ५६ कसोटी सामने खेळले आहेत ज्यात त्याला २१५ बळी घेण्यात यश आले आहे. त्याची कसोटीतील सर्वोत्तम कामगिरी ६७ धावांत ६ बाद आहे. दुसऱ्या कसोटीत त्याचे न खेळणे हा ऑस्ट्रेलियासाठी मोठा धक्का मानला जात आहे.


हे ही वाचा :  http://Vijay Hazare Trophy : व्यंकटेश अय्यरची धमाकेदार ३ अर्धशतकीय खेळी; १० षटकारांसह केल्या १५१ धावा

- Advertisement -

 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -