घरक्रीडानेहरा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरचा नवा बॉलिंग प्रशिक्षक

नेहरा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरचा नवा बॉलिंग प्रशिक्षक

Subscribe

भारताचा माजी खेळाडू आशिष नेहरा आता आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरचा मुख्य गोलदांजी प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहे.

आयपीएलमधील विराटचा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरला आतापर्यंत झालेल्या ११ सिझनमध्ये एकदाही विजय मिळवता आला नाहीय. विराट सारखे कणखर नेतृत्त्व, एबी सारखा अप्रतिम खेळाडू आणि बरेच दिग्गज खेळाडू असून देखील आरसीबीला एकदाही विजय मिळवता आला नसल्याने आता संघाच्या प्रशिक्षकांच्या निवडीवर संघ संचालनाने विशेष लक्ष दिले असून काही दिवसापूर्वीच गॅरी कस्टर्नची मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली होती. त्यानंतर आता संघाच्या गोलदांजी प्रशिक्षक पदी आशिष नेहराची निवड करण्यात आली आहे. आरसीबीने आपल्या ऑफिशिअल ट्विटर हँडलवरून ट्विट करत ही माहिती दिली आहे.


डॅनियल व्हिट्टोरी हा आरसीबीचा बराच काळ प्रशिक्षक असून आतापर्यंत आरसीबीला काही खास कामगिरी करता आली नाही. त्यामुले डॅनियल व्हिट्टोरीची प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी केली गेली असून आता त्याच्या जागी गॅरी कस्टर्न आणि आशिष नेहरा यांची नेमणुक करण्यात आली आहे. आशिष नेहराने १९९९ साली भारताच्या संघात पदार्पण केले असून त्याने आतापर्यंत १७ कसोटी सामन्यात ४४ तर १२० एकदिवसीय सामन्यात १५७ विकेट्स घेतल्या आहेत. तर २७ टी-२० सामन्यात ३४ विकेट्स आपल्या नावे केले आहेत.

वाचा – गॅरी कस्टर्न यांची रॉयल चॅलेंजर्स बंगळुरच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -