घरक्रीडाAustralian Open 2022 : Ashleigh Barty ने रचला इतिहास, ४४ वर्षानंतर ऑस्ट्रेलियन...

Australian Open 2022 : Ashleigh Barty ने रचला इतिहास, ४४ वर्षानंतर ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद

Subscribe

जागतिक टेनिसपटूंच्या क्रमवारीतील नंबर १ खेळाडू असलेल्या अॅश्ले बार्टीने एक नवा इतिहास आपल्या नावावर केला आहे. पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन ओपन ही स्पर्धा जिंकण्याचा मान एश्लेने मिळवला आहे. महिला एकेरी लढतीत अंतिम सामन्यात एश्लेने अमेरिकेच्या डॅनिएल कॉलिन्सचा सरळ सेटमध्ये ६-३, ७-६ असा पराभव केला. बार्टीने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये एकही सेट गमावला नाही. जवळपास ४४ वर्षानंतर ऑस्ट्रेलियन महिला खेळाडूला हा विक्रम आपल्या नावावर करण्यात यश आले आहे.

- Advertisement -

ऑस्ट्रेलियन खेळाडू बार्टीने सुरूवातीपासूनच सामन्यात आपला दबदबा ठेवला होता. त्यामुळेच पहिला सेट हा ६-३ अशा फरकाने आपल्या नावे केला. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये अमेरिकन खेळाडूने पुन्हा एकदा सेटमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न केला खरा. पण दुसरा सेटदेखील ७-६ ने गमवावा लागला. लागोपाठ दुसरा सेट जिंकत ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद जिंकत तिसरा ग्रॅंडस्लॅम जिंकण्याचा विक्रम अॅश्लेने आपल्या नावे केला. याआधी फ्रेंच ओपन २०१९ मध्ये आणि विंबलडनचा पुरस्कार २०२१ मध्ये या खेळाडूने जिंकला आहे.

बार्टीचा ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये विजय आणि पराभवाचा रेकॉर्ड २४-८ असा झाला आङे. याआधीच्या टूर्नामेंटमध्ये तिने सेमी फायनलमध्ये मजल मारली होती. त्यामध्ये सोफिया केनिनच्या विरोधात तिचा पराभव झाला होता. अॅश्ले बार्टीने १९७८ मध्ये झालेल्या विक्रमाची बरोबरी केली आहे. याआदी क्रिस ओ नीलने ऑस्ट्रेलियन ओपनचा पुरस्कार जिंकला होता.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -