घरक्रीडामेलबर्नमधील विराट कोहलीच्या वाढदिवसाबाबत अश्विनने सांगितले गुपित; म्हणाला...

मेलबर्नमधील विराट कोहलीच्या वाढदिवसाबाबत अश्विनने सांगितले गुपित; म्हणाला…

Subscribe

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि रन-मशीन विराट कोहलीचा आज वाढदिवस आहे. विराटचा आज (5 नोव्हेंबर) 34 वा वाढदिवस आहे. जगभरातील अनेक चाहते त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहेत. आतापर्यंत त्याने भारतीय संघासाठी अनेकदा महत्त्वपुर्ण खेळी केली आहे. 2 वेळा भारतीय संघाने विश्वचषक जिंकला त्यावेळी विराट संघामध्ये होता.

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि रन-मशीन विराट कोहलीचा आज वाढदिवस आहे. विराटचा आज (5 नोव्हेंबर) 34 वा वाढदिवस आहे. जगभरातील अनेक चाहते त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहेत. आतापर्यंत त्याने भारतीय संघासाठी अनेकदा महत्त्वपुर्ण खेळी केली आहे. 2 वेळा भारतीय संघाने विश्वचषक जिंकला त्यावेळी विराट संघामध्ये होता. सध्या ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेत सुद्धा त्याने चांगली कामगिरी केली आहे. दरम्यान, वाढदिवसानिमित्त विराटचा वाढदिवस मेलबर्नमध्येच सहकाऱ्यांनी साजरा केला. याबाबत फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने पत्रकार परिषदेत माहिती दिली. (ashwin revealded virat kohli cut the cake and celebrated birthday before coming to practice ind zim melbourne)

भारतीय संघ रविवारी (6 नोव्हेंबर) झिम्बाब्वेविरुद्ध सामना खेळणार आहे. T20 विश्वचषकाच्या सुपर-12 फेरीतील ग्रुप-2 मधील हा सामना भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने हा सामना जिंकल्यास उपांत्य फेरीत प्रवेश मिळेल. मात्र झिम्बाब्वे जिंकला तर भारतासाठी कठीण होणार आहे.

- Advertisement -

मेलबर्नमधील याच मैदानावर 23 ऑक्टोबर रोजी विराट कोहलीने आक्रमक फलंदाजी केली होती. विराट कोहलीच्या या खेळीच्या जोरावर भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव केला होता. अशा स्थितीत भारतीय क्रिकेटप्रेमींना या मैदानावर विजयाची अपेक्षा आहे. भारतीय संघ सध्या 6 गुणांसह ब गटात अव्वल स्थानावर आहे. तसेच, दक्षिण आफ्रिकेचा संघ 5 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

दरम्यान, अश्विनने शनिवारी झिम्बाब्वेविरुद्धच्या टी-२० विश्वचषक सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत विराटच्या वाढदिवसाचा केक सरावाच्या आधी कापल्याचे सांगितले.

- Advertisement -

विराट कोहलीने आतापर्यंत 102 कसोटी, 262 एकदिवसीय आणि 113 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्‍याच्‍या नावावर कसोटीमध्‍ये 27 शतके, 28 अर्धशतकांसह 8074 धावा आहेत, तर एकदिवसीय क्रिकेटमध्‍ये 43 शतके आणि 64 अर्धशतकांसह 12344 धावा आहेत. T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याने एक शतक आणि 36 अर्धशतके झळकावली, ज्यामुळे त्याने एकूण 3932 धावा केल्या आहेत.


हेही वाचा – IPS अधिकाऱ्याविरोधात महेंद्रसिंग धोनीची उच्च न्यायालयात याचिका, नेमकं प्रकरण काय?

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -