घरक्रीडाधोनीचे लक्ष वेधून घ्यायचे होते!

धोनीचे लक्ष वेधून घ्यायचे होते!

Subscribe

अश्विनने सांगितला कारकिर्दीच्या सुरुवातीचा किस्सा

खेळाडू म्हणून माझी जी कारकीर्द आहे, त्यावर महेंद्रसिंग धोनीचा खूप मोठा प्रभाव आहे. आयपीएलमध्ये कारकिर्दीच्या सुरुवातीला धोनीचे लक्ष वेधून घेण्याचा माझा प्रयत्न असायचा, असे भारताचा प्रमुख ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन म्हणाला. आयपीएल स्पर्धेमुळे भारताला बरेच प्रतिभावान खेळाडू मिळाले असून अश्विन या खेळाडूंपैकीच एक आहे. धोनीचा चेन्नई सुपर किंग्स हा आयपीएल स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. अश्विनने त्याच्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात २००८ मध्ये याच संघातून केली. त्याने त्यावेळचा किस्सा सांगितला.

आयपीएलमध्ये प्रत्येक खेळाडूला खेळायचे असते आणि चेन्नई सुपर किंग्सकडून तुम्हाला खेळण्याची संधी मिळाली, तर त्यासारखे दुसरे काही नाही. मला स्वतःची ओळख निर्माण करायची होती. अश्विन कोण आहे हे धोनी, मॅथ्यू हेडन किंवा मुथय्या मुरलीधरन यांना माहीत नव्हते. त्यामुळे ‘अश्विन कोण आहे हे मी या लोकांना दाखवून देईन’ असा विचार करून सुरुवातीला खेळत होते. माझा हा विचार मूर्खपणाचा होता किंवा उर्मटपणाचा, हे ठाऊक नाही. मी मुरलीधरनसोबत किंवा त्याच्या जागी खेळीन असे कोणालाही वाटत नव्हते. मात्र, माझा स्वतःवर विश्वास होता, असे अश्विन म्हणाला.

- Advertisement -

पहिल्या वर्षी (२००८ मध्ये) मी नेट्समध्ये हेडन, जेकब ओरम आणि स्टिफन फ्लेमिंग यांना गोलंदाजी करत होतो. त्यांना माझ्याविरुद्ध खेळताना बरीच अडचण येत होती. त्यामुळे माझ्यामध्ये प्रतिभा आहे हे त्यांना कळले होते. परंतु, धोनीला माझ्याविषयी फारशी माहिती नव्हती. तो नेट्समध्ये मुरलीधरनसारख्या गोलंदाजाविरुद्ध मोठे फटके मारायचा. त्यामुळे मी विचार केला की,‘जर मी धोनीला अडचणीत टाकू शकलो, तर मला मुरलीधरनच्या जागी खेळण्याची संधी मिळू शकेल.’ मला त्याचे लक्ष वेधून घ्यायचे होते. अखेर चॅलेंजर ट्रॉफीमध्ये मी त्याला बाद केले आणि तेव्हा कुठे त्याला माझी ओळख झाली, असेही अश्विनने सांगितले.

त्याने नेहमीच पाठिंबा दिला…

- Advertisement -

२०१० मध्ये चॅम्पियन्स लीग स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स आणि व्हिक्टोरिया यांच्यातील सामना बरोबरीत राहिल्याने सुपर ओव्हर खेळवण्यात आली. सुपर ओव्हर टाकण्यासाठी अश्विनने स्वतःहून हात उचलला आणि धोनीने लगेच त्याच्या हातात चेंडू सोपवला. मात्र, अश्विनने या षटकात २३ धावा खर्ची केल्या. त्यावेळी धोनीची काय प्रतिक्रिया होती असे अश्विनला विचारले असता त्याने सांगितले की, तू कॅरम बॉल टाकला पाहिजे होतास असे धोनी मला म्हणाला. त्याने मला नेहमीच पाठिंबा दिला आहे आणि हवी तशी गोलंदाजी करण्याची मोकळीकही दिली आहे, असे अश्विन म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -