घर क्रीडा आशिया चषक 2022 : अंतिम सामना विजयानंतर श्रीलंकेच्या संघावर भरघोस पैशांचा पाऊस

आशिया चषक 2022 : अंतिम सामना विजयानंतर श्रीलंकेच्या संघावर भरघोस पैशांचा पाऊस

Subscribe

पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात आशिया चषक 2022 चा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात श्रीलंकेने 23 धावांनी पाकिस्तानवर विजय मिळवला आहे. श्रीलंकेच्या 170 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाचा डाव श्रीलंकेच्या गोलंदाजांनी 147 धावांवर गुंडाळला.

पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात आशिया चषक 2022 चा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात श्रीलंकेने 23 धावांनी पाकिस्तानवर विजय मिळवला आहे. श्रीलंकेच्या 170 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाचा डाव श्रीलंकेच्या गोलंदाजांनी 147 धावांवर गुंडाळला. मात्र, या सामन्यानंतर श्रीलंकेच्या संघाला मोठी बक्षीस रक्कम मिळाली आहेत. ‘प्लेअर ऑफ द मॅच’ आणि ‘प्लेअर ऑफ द सिरीज’सह अनेक खेळाडूंना बक्षीस मिळाले आहेत. याविजयासह श्रीलंकेने आशिया कपवर सहाव्यांदा नाव कोरले आहे. (asia cup 2022 final match sri lanka vs pakistan cricket team prize money)

बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी 1.5 लाख डॉलर्सचा धनादेश कर्णधार दासुन शनाकाकडे सुपूर्द केला. श्रीलंकेने फायनलमध्ये पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर संघाला 1.5 लाख डॉलरचा चेक देण्यात आला. भारतीय रुपयानुसार 1.2 कोटी इतकी रक्कम आहे. वानिंदू हसरंगा याला ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ म्हणून गौरविण्यात आले आहे. त्याला 15 हजार डॉलरचा धनादेश देण्यात आला. भारतीय रुपयानुसार हे सुमारे 12 लाख रुपये आहे. भानुका राजपक्षेला अंतिम सामन्यासाठी ‘प्लेअर ऑफ द मॅच’ म्हणून गौरविण्यात आले. राजपक्षे यांना 5 हजार डॉलर्सचा धनादेश देण्यात आला. सामन्यातील सर्वोत्तम कॅचसाठी 3 हजार डॉलर्सचा धनादेश देण्यात आला. पाकिस्तानचा संघ या स्पर्धेत दुसऱ्या स्थानावर राहिला. पाकला बक्षीस म्हणून 75 हजार डॉलर (सुमारे 60 लाख रुपये) देण्यात आले आहे.

- Advertisement -

या सामन्यात आशिया कपच्या अंतिम सामन्यामध्ये श्रीलंकेने पाकिस्तानचा 23 धावांनी पराभव करत विजयाचा षटकार मारला. श्रीलंकेकडून प्रमोद मधूशनने 4 विकेट्स, वानिंदू हसरंगाने 3 तर करूणारत्नेने 2 विकेट्स घेतल्या. पाकिस्तानतर्फे मोहम्मद रिझवानने सर्वाधिक 52 धावांची अर्धशतकी खेळी केली. पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी सुरूवातीलाच श्रीलंका संघाला धक्के दिले.

पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी सुरूवातीलाच श्रीलंका संघाला धक्के दिले. नसीम शहाने श्रीलंकेच्या कुसल मेंडिसला भोपळाही फोडू दिला नाही. त्यानंतर आलेल्या निसांकाला 8 धावा आणि गुणतिलका 1 धावेवर हॅरीस रॉफने बाद करत दोन धक्के दिले. कर्णधार शनाकालाही शादाबने 2 धावांवर माघारी पाठवले.

- Advertisement -

श्रीलंकेने 58 धावांवर 5 विकेट्स गमावल्या होत्या. त्यावेळी भानुका राजपक्षेने मोर्चा आपल्या हाती घेत जबरदस्त बॅटींग करत 45 चेंडूत 71 धावांची नाबाद खेळी केली. यामध्ये त्याने 6 चौकार आणि 3 षटकार मारले. त्यासोबतच वानिंदू हसरंगानेही 21 चेंडूंमध्ये 36 धावा केल्या. या जोरावर श्रीलंकेने पाकिस्तानला 171 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र, श्रीलंकेच्या 171 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव 147 धावांत संपुष्टात आला.


हेही वाचा – टी-२० विश्वचषकात भारतीय संघाला धक्का, ‘हा’ खेळाडू वर्ल्ड कपमधून बाहेर

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -