घरक्रीडाAsia Cup Hockey : भारत आणि पाकिस्तानचा प्रथम सामना अनिर्णित

Asia Cup Hockey : भारत आणि पाकिस्तानचा प्रथम सामना अनिर्णित

Subscribe

भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातला आशिया कप हॉकीचा (Asia Cup Hockey) पहिला सामना 1-1 ने अनिर्णित राहिला. गतविजेत्या भारताने शेवटच्या क्षणांमध्ये गोल गमावल्यामुळे हा सामना अनिर्णित राहिला.

भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातला आशिया कप हॉकीचा (Asia Cup Hockey) पहिला सामना 1-1 ने अनिर्णित राहिला. गतविजेत्या भारताने शेवटच्या क्षणांमध्ये गोल गमावल्यामुळे हा सामना अनिर्णित राहिला. भारताचा पुढचा सामना आता मंगळवारी जपानविरुद्ध होणार आहे. जपानने याआधी इंडोनेशियाचा 9-0 ने पराभव केला आहे.

पाकिस्तानला सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटाला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला होता. मात्र, त्यांना गोल करता आला नसून, काही सेकंदांनंतर भारतालाही पेनल्टी कॉर्नरची संधी चालून आली. परंतु नीलम संदीप सेसचा शॉट पाकिस्तानी गोलकीपर अकमल हुसैनने वाचवला.

- Advertisement -

भारताने पाकिस्तानी डिफेन्सवर सतत दबाव बनवून ठेवला होता. तसेच, पहिल्या क्वार्टरमध्ये दोन आणखी पेनल्टी कॉर्नर मिळवले. कार्तीने त्याचा पहिला आंतरराष्ट्रीय गोल सामन्याच्या नवव्या मिनिटाला केला. त्यानंतर सर्वत्र त्याच्या या गोलवर कौतुकांचा वर्षावर करण्यात आला. सामन्यात पाकिस्तानला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला होता. पण यामध्ये त्यांना यश आले नाही. दुसऱ्या क्वार्टरमध्ये पाकिस्तानच्या गोलकीपरने शानदार बचाव करत पवन राजभरला गोल करून दिला नाही.

भारताला 21व्या मिनिटाला मिळालेला पेनल्टी कॉर्नरही फेल गेला. सामन्याच्या हाफटाईमच्या दोन मिनिटे आधी पाकिस्तानला बरोबरीची करण्याची संधी होती. मात्र पुन्हा एकदा त्यांचा पेनल्टी कॉर्नर फुकट गेला. दुसऱ्या हाफमध्ये पाकिस्तानने आक्रमक खेळ केला आणि तिसरा पेनल्टी कॉर्नर मिळवला.

- Advertisement -

परंतु, रिजवान अलीचा शॉट बाहेर गेला. याच्या काही मिनिटांनी भारतीय गोलकीपर सूरज करकेराने अब्दुल राणाचा जवळचा शॉट वाचवला. तसेच, रिबाऊंडवरही अफराजलाही गोल करू दिला नाही.


हेही वाचा – Womens T20 Challenge : शर्मिनचा खतरनाक थ्रो; ‘या’ खेळाडूला केले रनआऊट

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -