आशिया चषकातील ‘या’ सामन्याच्या तिकिटांच्या बुकिंगवेळी वेबसाइट क्रॅश

आशिया चषक 2022 चा पहिला सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. येत्या 27 ऑगस्टपासून आशिया चषकाला सुरूवात होणार आहे. 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या कालावधीमध्ये आशिया चषक खेळवला जाणार आहे. भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने येणार असून, 28 ऑगस्ट रोजी सामना रंगणार आहे.

आशिया चषक 2022 चा पहिला सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. येत्या 27 ऑगस्टपासून आशिया चषकाला सुरूवात होणार आहे. 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या कालावधीमध्ये आशिया चषक खेळवला जाणार आहे. भारत आणि पाकिस्तानचे संघ आमनेसामने येणार असून, 28 ऑगस्ट रोजी सामना रंगणार आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी चाहत्यांनी तिकिट खरेदीसाठी गर्दी केल्याचे समजते. विशेष म्हणजे या सामन्यासाठीची तिकीट विक्री सुरू होताच वेबसाईटही क्रॅश झाल्याची माहिती समोर येत आहे.

आशिया चषकाबाबत क्रिकेट चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. आशिया चषकाच्या दुसऱ्या दिवशी होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याच्या तिकीट खरेदीसाठी चाहत्यांनी प्रचंड उत्सुकता दाखवली आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) होणाऱ्या आशिया चषकाची तिकीट सुरू झाली आहे.

यूएईमधील सर्वात लोकप्रिय वेबसाइटपैकी एक असलेल्या ‘प्लॅटिनमलिस्ट डॉट नेट’ या संकेतस्थळावर तिकीट विक्री सुरू आहे. भारत-पाकिस्तान सामन्याच्या तिकीट विक्रीमुळे वेबसाइटच्या ट्रॅफिकमध्ये 70 हजारांची वाढ झाली आहे. त्यामुळे ही वेबसाईट क्रॅश झाली.

आशिया कपसाठी भारतीय क्रिकेट संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दीपक हुडा, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, युझवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, आवेश खान.

बॅकअप खेळाडू – श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, दीपक चहर.

आशिया कपसाठी पाकिस्तानचा संघ

बाबर आजम (कर्णधार), शादाब खान, आसिफ इली, फख्र जमां, हैदर अली, हैरिस रउफ, इफ्तिकार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान, मोहम्मद वसीम जू., नसीम शाह, शाहीन शाह अफरीदी, शाहनवाज दहानी, उस्मान कादिर.


हेही वाचा – आशिया चषक 2022 : भारतासमोर पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीचे आव्हान