घरक्रीडालज्जास्पद! पाकिस्तानच्या 'या' फलंदाजाने बाद झाल्यानंतर अफगाणिस्तानच्या गोलंदाजावर उगारली बॅट

लज्जास्पद! पाकिस्तानच्या ‘या’ फलंदाजाने बाद झाल्यानंतर अफगाणिस्तानच्या गोलंदाजावर उगारली बॅट

Subscribe

रोमांचक सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानचा एक विकेटने पराभव केला आहे. अफगाणिस्ताननं दिलेले 130 धावांचे आव्हान पाकिस्तानने अखेरच्या षटकात एक गडी आणि चार चेंडू राखून पार केले. वेगवान गोलंदाज नसीम शाहने दोन खणखणीत षटकार लगावत पाकिस्तानला विजय मिळवून दिला.

रोमांचक सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानचा एक विकेटने पराभव केला आहे. अफगाणिस्ताननं दिलेले 130 धावांचे आव्हान पाकिस्तानने अखेरच्या षटकात एक गडी आणि चार चेंडू राखून पार केले. वेगवान गोलंदाज नसीम शाहने दोन खणखणीत षटकार लगावत पाकिस्तानला विजय मिळवून दिला. मात्र, या सामन्यात अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या खेळाडूंमध्ये आपापसात वाद झाल्याचे पाहायला मिळाले. पाकिस्तानचा फलंदाज आसिफ अलीने अफगाणिस्तानचा गोलंदाज फरीद अहमद याच्यावर बॅच उगारल्याचे दिसले.

नेमके काय घडले?

- Advertisement -

अफगाणिस्तानचा गोलंदाज फरीद अहमदच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा फलंदाज आसिफ अली बाद झाला. आसिफ 18.5 षटकांत बाद झाला. बाद झाल्यावर फरीद काही बोलला, त्यानंतर असिफ अलीचा संताप झाला आणि त्याने थेट बॅट फरीदच्या दिशेने उगारली. आसिफने बॅट उगारल्याचे बघताच इतर खेळाडूंनी मध्यस्थी करून त्यांना थांबवले.ट

आयसीसीच्या नियम काय सांगतो?

- Advertisement -

दरम्यान, क्रिकेटच्या मैदानावर असे लज्जास्पद कृत्य खपवून घेतले जात नाही. त्यामुळे आयसीसीच्या नियमांनुसार, खेळाडू आपली आक्रमकता स्वतःपुरती मर्यादित ठेवू शकतो. कोणत्याही खेळाडूने हात वर करणे किंवा प्रतिस्पर्ध्याला दुखापत करणे हे खपवून घेतले जात नाही. आसिफ अलीची घटना सामनाधिकारी ऐकतील आणि त्यानंतर पाकिस्तानच्या फलंदाजावरही एका सामन्याची बंदी घातली जाऊ शकते. दंड आकारला जाणे निश्चित आहे.

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील आशिया चषकाच्या सुपर फोरमध्ये बुधवारी अतिशय रोमांचक सामना पाहायला मिळाला. या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 6 गड्यांच्या मोबदल्यात 129 धावा केल्या. त्यानंतर प्रत्युत्तरात अखेरच्या षटकात पाकिस्तानचा गोलंदाज नसीम शाहने सलग 2 षटकार मारत संघाला विजय मिळवून दिला.

पाकिस्तान क्रिकेट संघ आशिया कपच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. बुधवारी अफगाणिस्तान संघाविरुद्धच्या अत्यंत रोमांचक सामन्यात संघाने श्रीलंकेविरुद्ध अंतिम सामना निश्‍चित केला. अफगाणिस्तान संघाने इब्राहिम झद्रानच्या 35 आणि हजरतुल्ला झाझाईच्या 21 धावांच्या जोरावर 129 धावा केल्या. त्यानंतर पाकिस्तानविरुद्ध अप्रतिम गोलंदाजी करत सामना शेवटपर्यंत खेचून आणला. पाकिस्तानकडून फजल फारुकी आणि फरीद अहमद यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले आणि 9 बळी घेतले. शेवटच्या षटकात 11 धावांची गरज होती आणि नसीम शाहने सलग दोन षटकार मारून संघाला विजय मिळवून दिला.

मियांदाद बॅटने लिलीला मारण्यासाठी धावला

क्रिकेटच्या इतिहासात काही वर्षापूर्वी ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानच्या दोन दिग्गजांमध्ये मैदानावर हाणामारी झाली होती. प्रसिद्ध खेळाडू डेनिस लिली आणि जावेद मियांदाद यांच्यात ही लढत झाली होती. मियांदाद बॅटने लिलीला मारण्यासाठी धावला होता. या घटनेला विस्डेन अल्मनॅकने कसोटी इतिहासातील सर्वात अशोभनीय घटना मानली आहे.

जावेद मियांदादच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघ ऑक्टोबर 1981 मध्ये तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाला पोहोचला. कर्णधार म्हणून मियांदादचा हा पहिलाच विदेश दौरा होता. आणि तो एका संघाचे नेतृत्व करत होता ज्यामध्ये एकसंधता नव्हती. मियांदादच्या नियुक्तीवर अनेक वरिष्ठ खेळाडू नाराज होते आणि त्यांनी नाराजी व्यक्त केली. विस्डेनने तर ‘मियांदादला संपूर्ण टीमचा पाठिंबा नव्हता’ असे नमूद केले.


हेही वाचा – श्रीलंका विरुद्धच्या पराभवानंतर रोहित शर्माचे मोठे वक्तव्य, म्हणाला ‘मी बाकी खेळाडूंनाही…’

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -