घरक्रीडाआशिया चषक 2022 चे वेळापत्रक जाहीर; अफगाणिस्तान आणि श्रीलंकेत होणार पहिला सामना

आशिया चषक 2022 चे वेळापत्रक जाहीर; अफगाणिस्तान आणि श्रीलंकेत होणार पहिला सामना

Subscribe

आशिया कप 2022 चे (Asia Cup 2022) वेळापत्रक जाहीर करण्यात आले. येत्या 27 ऑगस्टपासून आशिया कपला सुरूवात होणार आहे. तसेच, 11 सप्टेंबरला आशिया कपचा अंतिम सामना होणार आहे. या कममधील पहिला सामना अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यात होणार आहे.

आशिया कप 2022 चे (Asia Cup 2022) वेळापत्रक जाहीर करण्यात आले. येत्या 27 ऑगस्टपासून आशिया कपला सुरूवात होणार आहे. तसेच, 11 सप्टेंबरला आशिया कपचा अंतिम सामना होणार आहे. या कममधील पहिला सामना अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यात होणार आहे. विशेष म्हणजे या कपमधील महत्वाचा सामना म्हणजेच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 28 ऑगस्टला होणार आहे. (asia cup 2022 time table announced india vs pakistan on 28th august)

यंदाचा आशिया कप टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवला जाणार आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी ट्वीट करत ही माहिती दिली असून बीसीसीआयने देखील जय याचे ट्वीट पोस्ट केले आहे.

- Advertisement -

पाच देश एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरणार

यंदा आशिया कपमध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान हे पाच देश एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरणार आहेत. या स्पर्धेतील सर्व सामने युएईमध्ये होणार असून दुबई, शारजाह या मैदानात सामने रंगतील. 11 सप्टेंबर रोजी अंतिम सामना पार पडणार आहे.

- Advertisement -

ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) तयारीच्या दृष्टीने यंदाचा आशिया कप टीम इंडियासह इतर देशांसाठीही महत्त्वाचा ठरणार आहे.

आशिया कपचे वेळापत्रक

ग्रुप ए :

  • भारत विरुद्ध पाकिस्तान : 28 ऑगस्ट, दुबई
  • भारत विरुद्ध क्वालिफायर : 31 ऑगस्ट, दुबई
  • पाकिस्तान विरुद्ध क्वालिफायर : 2 सप्टेंबर, शारजाह

ग्रुप बी :

  • श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान : 27 ऑगस्ट, दुबई
  • बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान : 30 ऑगस्ट, शारजाह
  • श्रीलंका विरुद्ध बांगलादेश : 1 सप्टेंबर, दुबई

 

  • B1 v B2: 3 सप्टेंबर, शारजाह
  • A1 v A2: 4 सप्टेंबर, दुबई
  • A1 v B1: 6 सप्टेंबर, दुबई
  • A2 v B2: 7 सप्टेंबर, दुबई
  • A1 v B2: 8 सप्टेंबर, दुबई
  • B1 v A2: 9 सप्टेंबर, दुबई
  • फायनल : 11 सप्टेंबर, दुबई

हेही वाचा – राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय सायकलपटू मीनाक्षीला अपघात; स्ट्रेचरवरून नेल्याने प्रेक्षकांमध्ये भीती

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -