Asia Cup 2023 : हायब्रिड मॉडेलनुसार पाकिस्तान (Pakistan) आणि श्रीलंकेत (Sri Lanka) होणाऱ्या आशिया चषकाला (Asia Cup 2023) अवघे काही तास शिल्लक असताना गतविजेत्या श्रीलंका संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. श्रीलंकेचे चार मोठे खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडले आहे. आघाडीचे खेळाडू उपलब्ध नसल्यामुळे श्रीलंका संघ कमकुवत झाला असून त्यांना यंदा आशिया चषक स्पर्धेचे जेतेपद राखणे फार कठीण होणार आहे. (Asia Cup 2023 Big blow to Sri Lanka Four big players out of Asia Cup)
हेही वाचा – Asia Cup 2023: क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; आता वर्ल्ड कप, आशिया चषक पाहा फुकटात
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीलंका संघाचा अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगा, वेगवान गोलंदाज दुष्मंता चमीरा, डावखुरा वेगवान गोलंदाज दिलशान मधुशंका आणि लाहिरू कुमारा आशिया चषक 2023 मधून बाहेर पडले आहेत. हे चार मोठे खेळाडू आशिया चषकाचा भाग नसल्यामुळे श्रीलंका संघाला त्यांची कमी नक्कीच जाणवणार आहे. गेल्या वर्षी खेळल्या गेलेल्या आशिया चषकात या चार खेळाडंमुळे श्रीलंकेने विजेतेपद पटकावले होते.
– Dushmantha Chameera ruled out.
– Dilshan Madhushanka ruled out.
– Wanindu Hasaranga unlikely to be a part.
– Lahiru Kumara unlikely to be a part. (Espncricinfo).– A massive headache for Sri Lanka ahead of Asia Cup 2023! pic.twitter.com/XsQAuZiLiO
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 28, 2023
वानिंदू हसरंगा श्रीलंकेसाठी मॅचविनर खेळाडू आहे. त्याने गेल्या काही सामन्यापासून दमदार अष्टपैलू कामगिरी केली आहे. याशिवाय तीन वेगवान गोलंदाजांना दुखापत झाल्यामुळे कर्णधार दासुन शनाकाची चिंता वाढली आहे. तीन अनुभवी वेगवान गोलंदाज संघाबाहेर झाल्यामुळे त्यांच्या जागी बदली खेळाडूंना संघात सामिल करावे लागणार आहे. पण श्रीलंका संघाला आवश्यक आशिया चषकासाठी आवश्यक असलेला अनुभव हे तीन वेगवान गोलंदाज देऊ शकतील का, हे पाहावे लागेल.
हेही वाचा – भारताची ओळख लवकरच क्रीडा देश; नीरज चोप्राच्या सुवर्णकमाईनंतर गावस्करांचं मोठं वक्तव्य
हायब्रिड मॉडेलनुसार खेळवला जाणार आशिया चषक
आशिया चषक 2023 ला उद्यापासून (30 ऑगस्ट) सुरुवात होणार आहे. हायब्रिड मॉडेलनुसार खेळवल्या जाणाऱ्या आशिया चषकात पहिला सामना पाकिस्तान आणि नेपाळ संघात खेळवला जाणार आहे. यंदाचा आशिया चषक एकदिवसीय फॉर्मेटमध्ये खेळवला जाणार आहे. सहा संघामध्ये ही आशिया चषक स्पर्धा रंगणार असून भारतीय संघाचे सर्व सामने श्रीलंकामध्ये होणार आहे. ग्रुप अ मध्ये भारत, पाकिस्तान आणि नेपाळ संघाचा समावेश आहे तर, ग्रुप ब मध्ये बांगलादेश, आफगाणिस्तान आणि श्रीलंका संघ असतील. आशिया चषकाचे चार सामने पाकिस्तानमध्ये होणार आहेत तर, 9 सामने श्रीलंकामध्ये खेळवले जाणार आहेत. 13 सामन्यानंतर आशिया चषकावर कोणता संघा नाव कोरणार हे पाहावे लागेल.