घर क्रीडा Asia Cup 2023: आशिया कपपूर्वी भारताला मोठा दिलासा; राहुल-श्रेयस परतणार ?

Asia Cup 2023: आशिया कपपूर्वी भारताला मोठा दिलासा; राहुल-श्रेयस परतणार ?

Subscribe

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने वेस्ट इंडिज दौऱ्यावर T- 20 मलिका 3-2 ने गमावल्यानंतर के.एल. राहुल आणि श्रेयस अय्यर यांचं आशिया कपमध्ये पुनरागमन होताना दिसेल, असे संकेत दिले आहेत. त्यामुळे हे दोघे पुन्हा संघात दिसण्याची शक्यता आहे.

श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांच्या दुखापतीनं भारतीय संघाची आणि चाहत्यांची चिंता वाढली होती. वर्ल्ड टेस्ट च‌ॅम्पियनशीपलाही दोघे मुकले होते. आता आगमी विश्वचषक आणि आशिया चषकात अय्यर खेळणार का? असा सवाल चाहत्यांच्या मनात वारंवार येत होता. परंतु आता या दोघांचं पुनरागमन होणार असल्याची सध्या चर्चा आहे. ( Asia Cup 2023 Big relief for India ahead of Asia Cup Will KL Rahul and Shreyas iyer return in Indian Team )

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने वेस्ट इंडिज दौऱ्यावर T- 20 मलिका 3-2 ने गमावल्यानंतर के.एल. राहुल आणि श्रेयस अय्यर यांचं आशिया कपमध्ये पुनरागमन होताना दिसेल, असे संकेत दिले आहेत. त्यामुळे हे दोघे पुन्हा संघात दिसण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

समोर आलेल्या माहितीनुसार, निवड समितीने श्रेयस अय्यर आणि के एल राहुल यांच्याबाबत एक मोठा निर्णय घेण्याचं ठरवलं आहे. लोकेश राहुल आणि श्रेयस अय्यरची येत्या शुक्रवारी तंदुरुस्तीची चाचणी होईल आणि त्यानंतर आशिया कप वनडे स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड होईल, असं समजतं. या दोघांच्या चाचणीनंतरच संघनिवड करण्याचा निर्णय निवड समिती तसंच संघव्यवस्थापनाने घेतला असल्याचं भारतीय क्रिकेट बोर्डाच्या काही सुत्रांकडून सांगण्यात आलं आहे. श्रेयस तसंच राहुलने सराव सुरू केला आहे. ते सध्या 80 टक्के मॅच फिट आहेत. आशिया कपसाठी अजून 18 दिवस आहेत, त्यामुळे तोपर्यंत ते तंदुरुस्त होण्याची शक्यता आहे. मात्र, निवड समिती कोणताही धोका पत्करण्यास तयार नाही. ते दोघेही तंदुरुस्त असल्यास सुर्यकुमार यादव आणि संजू स‌ॅमसन यापैकी एकालाच संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता शुक्रवारी होणाऱ्या तंदुरुस्ती चाचणीमध्ये नेमकं काय होणार, याची उत्सुकता सर्वांना असणार आहे.

या एका चाचणीमुळे श्रेयस आणि राहुल यांचे भविष्य स्पष्ट होऊ शकते. कारण जर ते या चाचणीत अपयशी ठरले तर त्यांना वर्ल्ड कपला मुकावं लागू शकतं आणि हा त्यांच्या करिअरसाठी एक मोठा धक्का असू शकतो. त्यामुळे आता या दोघांच्या चाचणीचा निकाल काय येतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

- Advertisement -

( हेही वाचा: Table Tennis : सुवर्णसंधी; वयाच्या 80 व्या वर्षीही घेता येणार टेबल टेनिसचा आनंद, मुंबईत स्पर्धा )

- Advertisment -