घर क्रीडा Asia Cup 2023 : लोकेश राहुलला संधी देऊ नका; भारताच्या माजी प्रशिक्षकाचा...

Asia Cup 2023 : लोकेश राहुलला संधी देऊ नका; भारताच्या माजी प्रशिक्षकाचा विरोध

Subscribe

Asia Cup 2023 : आशिया चषक स्पर्धा 2023 ला येत्या 30 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेला अवघे काही दिवस उरले असतानाही भारतासह तीन संघांनी अद्याप आपले संघ जाहीर केलेले नाहीत. परंतु भारताने संघ जाहीर करण्याआधीच भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एका लोकेश राहुलला संधी देऊ नका, असे म्हणत विरोध दर्शविला आहे. आशिया चषक स्पर्धा 2023 साठी विकेटकीपर फलंदाज केएल राहुल पुनरागमन करणं अपेक्षित आहे. तो सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये पुनर्वसन प्रक्रियेतून जात आहे. मात्र रवी शास्त्रीच्या इशाऱ्यानंतर त्याला भारतीय संघात संधी मिळणार का हे पाहावे लागेल. (Asia Cup 2023 Dont give Lokesh Rahul a chance Opposition from former India coach)

आयपीएल 2023 मध्ये केएल राहुलच्या पायाला दुखापत झाल्यानंतर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि तो बराच काळ क्रिकेटपासून दूर आहे. तो सध्या दुखापतीतून सावरत आहे. त्यामुळे आशिया चषक स्पर्धेसाठी त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये विचारात घेणे म्हणजे त्याच्यावर खूप मोठा जबाबदारी टाकण्यासारखे आहे, असे रवी शास्त्री एका कार्यक्रमात म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – India vs Ireland 1st T20 : अनुभवी नव्हे तर नवख्यांच्या साथीने जसप्रीत बुमराह करणार आयर्लंडशी दोन हात

दुखापतीतून सावरल्यावर लगेच राहुलवर एवढा ताण नको

आशिया चषक आणि विश्वचषक स्पर्धेत केएल राहुल हा भारताचा पहिला पसंतीचा यष्टिरक्षक असेल यात शंका नाही. पण संघात त्याची उपस्थिती भारतासाठी कठीण होऊ शकते. कारण तो आता कुठे दुखापतीतून सावरत आहे. जर त्याला संघात संधी मिळाली तर त्याला विकेटकिपींग करताना प्रत्येक चेंडूवर बैठका माराव्या लागतील, चपळ राहावे लागेल. त्यामुळे दुखापतीतून आता कुठे सावरलेल्या राहुलवर एवढा ताण नको, असे रवी शास्त्री म्हणाले.

बुमराह दुखापतीतून सावरला, मात्र नंतर 14 महिने बाहेर राहिला 

- Advertisement -

रवी शास्त्री म्हणाले की, दुखापतीतून सावरलेल्या खेळाडूंना थेट भारतीय संघात संधी देण्याची घाई निवड समितीने करू नये. यावेळी त्यांनी जसप्रीत बुमराहचे उदाहरण देताना म्हटले की, त्याला दुखापतीतून सावरल्यानंतर थेट भारतीय संघात तीन वेळा संधी देण्यात आली आणि त्याचे परिणाम आपण भोगले. तो दुखापतीमुळे 14 महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता.

हेही वाचा – कोकणच्या जलकन्येची देशपातळीवर भरारी; आता गाजवणार राष्ट्रीय स्पर्धा

केएल राहुलऐवजी युवा खेळाडूला संधी द्या 

दुखापतीतून सावरत असलेल्या केएल राहुलला थेट भारतीय संघात संधी देण्यापेक्षा युवा खेळाडू तिलक वर्माला मधल्या फळीत संधी द्या अशा सूचना रवी शास्त्री यांनी बोलून दाखवली आहे. याशिवाय अंतिम अकरातील अव्वल सात फलंदाजांमध्ये रवींद्र जडेजासह तीन डावखुरे फलंदाज असावेत, असा त्यांचा आग्रह आहे. ‘तिलक वर्माची कामगिरी मागील काही सामन्यांमध्ये प्रभावी आहे. त्यामुळे भारतीय संघाला डावखुऱ्या फलंदाजांवर लक्ष केंद्रित करायचे असेल, तर मी तिलक वर्माला संधी द्यावी. कारण गेल्या तीन महिन्यांत म्हणजेच आयपीएल किंवा भारतीय संघासोबत खेळताना तिलक वर्माने स्वतःला सिद्ध केले, असेही रवी शास्त्री म्हणाले.

- Advertisment -