घरक्रीडाAsia Cup 2023: भारतीय संघ जाहीर; या दिवशी होणार भारत- पाक सामना

Asia Cup 2023: भारतीय संघ जाहीर; या दिवशी होणार भारत- पाक सामना

Subscribe

बीसीसीआयने आशिया कपसाठी भारतीय संघ जाहीर केला आहे.आयपीएलमध्ये नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आता या संघात स्थान देण्यात आलं आहे. तसचं भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना कधी होणार याबाबतही सांगण्यात आलं आहे.

बीसीसीआयने आशिया कपसाठी भारतीय संघ जाहीर केला आहे. आशिया कप स्पर्धेच्या आयोजनाचा वाद गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु आहे. बीसीसीआय आणि पीसीबी या दोन क्रिकेट बोर्डांमध्ये आयोजनाच्या मुद्द्यावरुन वाद रंगला आहे. आता याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. बीसीसीआयने Asia Cup 2023 साठी भारताचा संघ जाहीर केला आहे. आयपीएलमध्ये नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आता या संघात स्थान देण्यात आलं आहे.( Asia Cup 2023 draft Schedule know the India Pakistan match schedule and BCCI declared team India for Asia Cup  )

भारताचा उदयोन्मुख संघ बीसीसीआयकडून जाहीर करण्यात आला आहे. आशिया चषक 2023 स्पर्धेत ज्या खेळाडूंनी IPL मध्ये दमदार कामगिरी केली होती त्यांना मोठी संधी देण्यात आली आहे. आयपीएलमध्ये रियान पराग, प्रभसिमरन सिंग, साई सुदर्शन, राजवर्धन हंगरगेकरसारख्या युवा खेळाडूंनी दमदार कामगिरी केली होती. या कामगिरीचा चांगलाच फायदा आता त्यांना होत असल्याचं दिसून येत आहे. बीसीसीआयने या खेळाडूंनी आशिया कपसाठी निवड केली आहे.

- Advertisement -

असा आहे भारतीय संघ

साई सुदर्शन, अभिषेक शर्मा (उपकर्णधार), निकिन जोस, प्रदोष रंजन पॉल, यश धुल ( कर्णधार), रियान पराग, निशांत सिंधू, प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), मान सुथार, युवराजसिंह डोडिया, हर्षित राणा, आकाश सिंग, नितिशकुमार रेड्डी, राजवर्धन हंगरगेकर.

सहा संघ, 2 ग्रुप

आशिया कप स्पर्धा यंदा वनडे फॉर्मेटनुसार पार पडणार आहे. एकूण सहा संघांना 2 गटात विभागण्यात आलं आहे. त्यापद्धतीने भारतीय संघ, पाकिस्तान आणि नेपाळ ए ग्रुपमध्ये आहेत. तर श्रीलंका, अफगणिस्तान आणि बांगलादेश हे तीन संघ आहेत. दोन्ही ग्रूपमधून एकूण 4 संघ सुपर 4 साठी क्वालिफाय होणार आहेत.

- Advertisement -

त्यानंतर सुपर 4 मध्ये रॉबिन राऊंड फॉर्मेटनुसार एकूण 6 सामने होणार आहेत. यानंतर 2 संघ अंतिम फेरीत पोहचतील आणि त्यांच्यात आशिया चॅम्पियन होण्यासाठी लढत होणार आहे.

( हेही वाचा:  ENG vs AUS: तो मी नव्हेच, कारण…, वृत्तपत्रात छापून आलेल्या फोटोवर बेन स्टोक्सचा भन्नाट स्ट्रोक )

या दिवशी होणार भारत- पाक सामना

आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघ आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ एकाच ग्रुपमध्ये आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानचा सामना हा तब्बल 3 वेळा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच, ज्या सहा संघांना आशिया कप स्पर्धेचं ड्राफ्ट शेड्यूल पाठवण्यात आलं आहे. त्यानुसार भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना 3 सप्टेंबरला होणार आहे. हा सामना श्रीलंकेतील दांबुला येथे खेळवला जाऊ शकतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -