Eco friendly bappa Competition
घर क्रीडा Asia Cup 2023 Final : अंतिम सामन्यापूर्वी श्रीलंका संघाला मोठा धक्का; स्टार...

Asia Cup 2023 Final : अंतिम सामन्यापूर्वी श्रीलंका संघाला मोठा धक्का; स्टार खेळाडू दुखापतीमुळे बाहेर

Subscribe

Asia Cup 2023 Final : आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धा अंतिम टप्पात आली असून उद्या (17 सप्टेंबर) स्पर्धेतील शेवटच्या आणि अंतिम सामन्यात भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) आमनेसामने येणार आहेत. या स्पर्धेत दोन्ही संघांनी दमदार कामगिरी करत आपली दावेदारी आशिया चषकासाठी आपली दावेदारी सिद्ध केली आहे. मात्र अंतिम सामन्यापूर्वी श्रीलंका संघाला मोठा झटका बसला आहे. अंतिम सामन्याच्या एक दिवस आधी स्टार खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर गेला आहे. श्रीलंका संघाचा फिरकीपटू गोलंदाज महिश तिक्षना (Mahish Tikshna) हा ग्रेड टू हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या सामन्यातून बाहेर पडला आहे. (Asia Cup 2023 Final A big blow to the Sri Lankan team before the final match Star player out due to injury)

हेही वाचा – Anurag Thakur : भारत विरुद्ध पाकिस्तान सामना; क्रीडामंत्र्यांचे महत्त्वाचे विधान

- Advertisement -

आशिया चषकातील सुपर 4 सामन्यात गुरुवारी (14 सप्टेंबर) पाकिस्तान आणि श्रीलंका आमनेसामने होते. या सामन्यात चौकार वाचवण्याच्या प्रयत्नात तिक्षनाला तिच्या अंगठ्याला दुखापत झाली. 34व्या षटकातील पाचव्या चेंडूवर त्याने उडी मारून चौकार वाचवण्याचा प्रयत्न केला यावेळी त्याचे स्नायू दुखावले गेले होते. त्यामुळे त्याच्यावर तत्काळ वैद्यकीय उपचार करण्यात आले. तो काहीकाळ मैदानातून बाहेर होता. मात्र दुखापत झालेली असतानही त्याने आपल्या षटकांचा कोटा पूर्ण करण्यासाठी मैदानात आला. श्रीलंका क्रिकेटने त्यांच्या सोशल मीडियावर ट्वीट करत तीक्षाना अंतिम सामन्यात खेळणार नसल्याची माहिती दिली आहे. याशिवाय श्रीलंका क्रिकेटने असेही म्हटले की, त्याच्या जागी फिरकीपटू सहान अरचिगेला संघात स्थान देण्यात आले आहे.

श्रीलंका क्रिकेटने ट्वीटमध्ये काय म्हटले?

- Advertisement -

श्रीलंका क्रिकटने म्हटले की, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात महिश तीक्षानाच्या उजव्या हाताच्या अंगठ्यावर दुखापत झाली असल्यामुळे तो अंतिम सामन्यासाठी उपलब्ध होणार नाही. त्याचे बोटाचे स्कॅन केल्यानंतर स्नायूंच्या दुखापतीची पुष्टी झाली आहे. श्रीलंका क्रिकेट निवडकर्त्यांनी तिक्षनाच्या जागी सहान अरचिगेला संघात स्थान दिले आहे. तिक्षना त्याचे पुनर्वसन करण्यासाठी हाय परफॉर्मन्स सेंटरमध्ये उपचार घेईल.

हेही वाचा – उफ्फ तुम्हारे उसूल, तुम्हारे आदर्श… Animation Video द्वारे काँग्रेसची मोदींवर टीका

आशिया चषकात महिश तीक्षणाची कामगिरी

आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यातून बाहेर पडण्यापूर्वी महिश तिक्षनाने श्रीलंकेसाठी पाच सामने खेळताना 29.12 च्या सरासरीने संघासाठी आठ विकेट घेतल्या आहेत. त्याने 5.15 इतक्या चांगल्या इकॉनॉमी रेटची नोंद केली आहे. 9 सप्टेंबर रोजी कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर बांगलादेशविरुद्ध चालू हंगामातील त्याची सर्वोत्तम कामगिरी केली. त्यामुळे तीक्षानाची दुखापत श्रीलंकेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. परंतु ते आता डाव्या हाताच्या युवा फिरकीपटू ड्युनिथ वेल्लालगेवर अवलंबून राहावे लागणार आहे. परंतु हा गोलंदाज अलीकडे जबरदस्त फॉर्ममध्ये आहे.

 

- Advertisment -