Asia Cup 2023 Final IND Vs Shri Lanka Final एशिया कपचा आज अंतिम सामना आहे. या फायनल सामन्यात भारत विरुद्ध श्रीलंका अशी लढत होणार आहे. श्रीलंकेच्या आर प्रेमदासा स्टेडिअममध्ये हा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याकडे दोन्ही देशाच्या क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे. (Asia Cup 2023 Final The thrill of the final of the Asia Cup will take place today Before that Axar Patel star player out)
टीम इंडियाने या सामन्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी केली आहे. नेट्समध्ये जोरदार सराव केला आहे. मात्र सामन्याच्या काही तासांआधी टीम इंडियाच्या गोटातून वाईट बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा स्टार मॅचविनर ऑलराऊंडर ही श्रीलंका विरुद्धच्या अंतिम सामन्यातून दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. त्यामुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलंय.
टीम इंडियाचा अष्टपैलू अक्षर पटेल हा दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. BCCI ने ट्वीट करत अक्षर पटेल हा दुखापतीमुळे आशिया कप 2023 फायनलमध्ये खेळणार नसल्याची माहिती दिली आहे. अक्षरला बांगलादेश विरुद्ध सुपर 4 मधील अखेरच्या सामन्यात 15 सप्टेंबर रोजी दुखापत झाली होती. हीच दुखापत भारतीय संघाला आणि वैयक्तिक पातळीवर अक्षर पटेल याच्यासाठी नुकसानकारक ठरली आहे. अक्षरच्या जागी ऑलराउंडरचा समावेश टीम इंडियात करण्यात आला आहे.
(हेही वाचा: Asia Cup 2023 Final : अंतिम सामन्यापूर्वी श्रीलंका संघाला मोठा धक्का; स्टार खेळाडू दुखापतीमुळे बाहेर )
बांगलादेश विरुद्ध झुंजार खेळी
अक्षर पटेल बांगलादेश विरुद्ध झुंजार खेळी केली. टीम इंडियाचा 266 धावांचा पाठलाग करताना डाव गडगडला. मात्र शुभमन गिलने शतक ठोकत टीम इंडियाला सामन्यात कायम ठेवलं. मात्र शतकानंतर शुभमन आऊट झाला. शुभमननंतर अक्षरने खिंड लढवली. अक्षरने अखेरच्या काही षटकांपर्यंत लढत दिली मात्र निर्णायक क्षणी आऊट झाला. अक्षर 42 धावांवर आऊट झाल्यानं टीम इंडियाला विजयाच्या आशाही संपुष्टात आल्या. अक्षरने आठव्या स्थानी येत 34 बॉलमध्ये 3 चौकार आणि 2 कडक षटकारांच्या मदतीनं 42 धावांची खेळी केली. तर 1 विकेटही घेतला.
भारतीय संघ
रोहित शर्मा ( कर्णधार), शुभमन गील, विराट कोहली, ईशान किशन, केएल राहुल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह
कधी होणार सामना?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील विजेतेपदाचा सामना रविवारी, 17 सप्टेंबरला होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरू होईल. नाणेफेक दुपारी अडीच वाजता होणार आहे.