Asia cup 2023 : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या आशिया चषक 2023 साठी (Asia cup 2023) आज (21 ऑगस्ट) भारतीय संघाची घोषणा करणार आहे. 30 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेसाठी अनेक देशांनी आपापल्या संघांची घोषणा केली असून आता भारतही आपला संघ जाहीर करणार आहे. या स्पर्धेसाठी कर्णधार रोहित शर्मासह अनेक वरिष्ठ खेळाडू भारतीय संघात परतणार आहेत. त्यामुळे या स्पर्धेसाठी 17 खेळाडूंमध्ये कोणाला संधी मिळते हे पाहावे लागेल. (Asia cup 2023 Indian team for Asia cup will be announced today Among the 15 players who will get a chance)
आशिया चषकासाठी भारतीय संघाची निवड करण्यासाठी कर्णधार रोहित शर्मा सध्या आयर्लंडच्या दौऱ्यावर असलेले निवड कमिटीचे सदस्य एसएस दास यांच्यासह व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीला उपस्थित राहणार आहेत. आज होणाऱ्या बैठकीत निवडकर्ते विश्वचषकादृष्टीनेही संघात कोणाला संधी द्यायची याचा विचार होण्याची शक्यता आहे. कारण आयसीसीने ड्राफ्ट टीम देण्याची अंतिम तारीख 5 सप्टेंबर ठरवली आहे. त्यामुळे निवडकर्त्यांना दोन्ही स्पर्धांसाठी 15 सदस्यीय संघ निवडायचा आहे. निवडलेल्या संघासह, काही राखीव खेळाडू सहा दिवसांच्या शिबिरासाठी बेंगळुरूमध्ये एकत्र येतील आणि नंतर श्रीलंकेला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील वरिष्ठ पुरुष निवड समिती भारतीय संघात कोणाला संधी देते हे पाहावे लागेल.
हेही वाचा – Vande Bharat Express: भगव्या रंगातील वंदे भारत एक्स्प्रेस पाहिली का?
श्रेयस अय्यर, केएल राहुलच्या निवडीवर सस्पेन्स कायम
श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांनी बेंगळरु येथील एनसीएमध्ये फिटनेसवर काम केले आहे. त्यांचे फलंदाजी करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. एनसीएमधील सराव सामन्यातही या दोघांनी भाग घेतला होता. श्रेयस अय्यरने या आठवड्याच्या सुरुवातीला झालेल्या पहिल्या सराव सामन्यात सर्व फिटनेस टेस्ट पास केल्याचे समजते. त्याने संपूर्ण 50 षटके क्षेत्ररक्षण करताना 38 धावा केल्या आहे. एनसीए प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण आणि फलंदाजी प्रशिक्षक हृषिकेश कानिटकर हे या सराव सामन्यावर बारीक लक्ष ठेवून होते. केएल राहुलही पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचं समोर आले आहे.
इशान किशन यष्टिरक्षकाच्या शर्यतीत आघाडीवर
ऋषभ पंत सध्या दुखापतीतून सावरत आहे, त्यामुळे भारताच्या यष्टिरक्षकाची कोंडी केवळ राहुलच्या फिटनेसमुळे दूर होऊ शकते. कारण दुसरा अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज भारताकडे नाही. जर केएल राहुलची निवड झाली तर तो 12व्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसेल, अशी अपेक्षा आहे. मात्र त्याची निवड न झाल्यास इशान किशन या शर्यतीत आघाडीवर आहे. इशान किशनच्या निवडीमुळे भारतीय संघाला फलंदाजीचा क्रम बदलण्याची संधीही मिळेल. अनेक माजी खेळाडूंसोबतच भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांचेही हेच मत आहे.
हेही वाचा – इंस्टाग्रामवर बाळाचा व्हिडीओ टाकून सीमा म्हणाली- हमेशा खुश रहो, वाचा काय आहे सत्यता
चौथ्या क्रमांकावर कोणाला संधी?
भारतीय संघाची निवड करताना चौथ्या नंबरवर कोणाला संधी द्यायची हा प्रश्न निवडकर्तेंना पडणार आहे. पण श्रेयस अय्यर चौथ्या नंबरचा प्रश्न सोडवू शकतो. 2019 च्या विश्वचषकात भारतीय संघाला चौथ्या नंबरवर कोणाला संधी द्यायची हा प्रश्न पडला होता. त्यावेळी त्यांनी विजय शंकरला संधी दिली आणि अंबाती रायडूला बाहेर बसवले होते. मात्र विजय शंकरला स्पर्धेच्या मध्यभागी दुखापत झाली आणि त्याच्या जागी रिषभ पंतचा संघात समावेश करण्यात आला होता. श्रेयसच्या अनुपस्थितीत भारतीय संघाने वेस्ट इंडिज दौऱ्यावर चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन आणि अक्षर पटेल यांना खेळवले. हे खेळाडू एकदिवसीय सामन्यात मिळालेल्या संधीचा फायदा उचलू शकले नाहीत. ते टी-20 सामन्यासाठी फिनिशरच्या रोलमध्ये चांगले बसतात.
आशिया चषक हायब्रीड मॉडेलच्या आधारे खेळवला जाणार
आशिया चषक 2023 स्पर्धा यावेळी हायब्रीड मॉडेलच्या आधारे खेळवली जाणार आहे. यजमान पाकिस्तानमध्ये फक्त 4 सामने खेळवले जातील तर, अंतिम सामन्यासह उर्वरित 9 सामने श्रीलंकेत होतील. यावेळी आशिया चषक एकदिवसीय स्वरूपात खेळवला जाईल.
हेही वाचा – अमेरिका : राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत भारतीय वंशाचा उद्योजक; वाढती लोकप्रियता ठरू शकते गेमचेंजर
आशिया चषकासाठी भारताचा संभाव्य संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, इशान किशन, कुलदीप यादव, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, युझवेंद्र चहल/रविचंद्रन अश्विन
भारत-पाकिस्तान सामना कधी?
भारतीय क्रिकेट संघ आशिया चषक 2023 स्पर्धेत आपला पहिला सामना 2 सप्टेंबर रोजी श्रीलंकेतील कँडी येथे कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. यानंतर भारताला 4 सप्टेंबरला नेपाळविरुद्ध दुसरा सामना खेळायचा आहे. भारत, पाकिस्तान आणि नेपाळ हे संघ गट अ मध्ये आहेत. ब गटात श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या संघांचा समावेश आहे.
आशिया चषकावर भारताचा दबदबा
आशिया चषकाच्या इतिहासात भारतीय संघाचा दबदबा राहिला आहे. स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत 15 हंगाम खेळले गेले आहेत. यापैकी भारतीय संघाने सर्वाधिक 7 वेळा (1984, 1988, 1990-91, 1995, 2010, 2016, 2018) विजेतेपद पटकावले आहे. त्याचबरोबर श्रीलंकेने सहा (1986, 1997, 2004, 2008, 2014, 2022) विजेतेपदे जिंकली आहेत. पाकिस्तानचा संघ फक्त दोनदा (2000, 2012) आशिया चषक आपल्या नावावर करू शकला आहे.
आशिया चषक 2023 चे वेळापत्रक
30 ऑगस्ट : पाकिस्तान विरुद्ध नेपाळ – मुलतान
31 ऑगस्ट : बांगलादेश विरुद्ध श्रीलंका – कॅंडी
2 सप्टेंबर : भारत विरुद्ध पाकिस्तान – कॅंडी
3 सप्टेंबर : बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान – लाहोर
4 सप्टेंबर : भारत विरुद्ध नेपाळ – कॅंडी
5 सप्टेंबर : श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान – लाहोर