घर क्रीडा Asia Cup 2023 : खेळाडूचा फॉर्म महत्त्वाचं की नाव? लाईव्ह चर्चेदरम्यान मोहम्मद...

Asia Cup 2023 : खेळाडूचा फॉर्म महत्त्वाचं की नाव? लाईव्ह चर्चेदरम्यान मोहम्मद कैफ आणि गौतम गंभीर भिडले

Subscribe

Asia Cup 2023 : भारतीय संघाची (Indian Team) आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेत चांगली सुरुवात झाली नाही. पाकिस्तानविरुद्ध भारताचा पहिलाच सामना पावसामुळे वाहून गेला, त्यामुळे क्रिडा चाहत्यांचा हिरमोड झाला. दरम्यान, या सामन्यात केएल राहुलच्या अनुपस्थितीत युवा खेळाडू इशान किशनने 81 चेंडूंत 82 धावांची दमदार खेळी केली. परंतु केएल राहुल पूर्णपणे फिट होऊन श्रीलंकेत दाखल होताच इशान किशनला बाहेर बसावे लागणार आहे. याच गोष्टीवरून भारताचे माजी खेळाडू मोहम्मद कैफ आणि गौतमी गंभीर यांच्यात शाब्दिक वाद झाल्याचे पाहायला मिळाले. (Asia Cup 2023 Is the players form more important than the name Mohammad Kaif and Gautam Gambhir clashed during a live discussion)

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी युवा यष्टीरक्षक-फलंदाज इशान किशनची भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड करण्यात आली. राहुल द्रविड यांनी स्पर्धेपूर्वी पत्रकार परिषदेत म्हटले होते की, आशिया चषक स्पर्धेत केएल राहुल भारताच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. असे असताना पल्लेकेले येथे भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान, स्टार स्पोर्ट्वसवरील चर्चेदरम्यान मोहम्मद कैफ आणि गौतम गंभीर दोघेही वाद घालताना दिसले.

- Advertisement -

हेही वाचा – Asia Cup 2023 : भारतीय संघाच्या पुढील सामन्यावरही पावसाचे सावट; सुपर-4 मध्ये कसा पोहोचणार?

ईशान किशन सर्वक्षेष्ठ खेळाडू, पण…

मोहम्मद कैफला प्रश्न विचारण्यात आला की, दबावाखाली इशान किशन आणि केएल राहुलने केलेली चमकदार कामगिरी लक्षात घेऊन तो कोणाला संघात स्थान देईल? केएल राहुल तंदुरुस्त झाल्यावर इशान किशनला संघातून वगळावे लागेल, असे उत्तर कैफने दिले. त्याने असेही म्हटले की, केएल राहुल मॅच विनर फलंदाज आहे. 5व्या क्रमांकावर खेळताना त्याने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे केएल राहुल तंदुरुस्त झाल्यावर त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळेल आणि इशान किशनला पुढील संधीची वाट पाहावी लागेल. ईशान किशन सर्वक्षेष्ठ खेळाडू आहे. त्याची कामगिरी दिवसेंदिवस उंचावत आहे. त्याच्या नावावर द्विशतकही आहे. मात्र तो सध्या केएल राहुलची जागा घेऊ शकत नाही. कारण केएल राहुल खराब फॉर्ममुळे संघाबाहेर नाही आहे. तो दुखापतीमुळे खेळत नाही.

- Advertisement -

दरम्यान, गौतम गंभीरने कैफच्या विधानाशी असहमती दर्शविली आहे. त्याने आपले मत मांडताना म्हटले की, मोहम्मद कैफला काही प्रश्न विचारले. त्याने म्हटले की, विश्वचषकात फॉर्मपेक्षा महत्त्वाचा की नाव? जर कोहली किंवा रोहितने सलग चार अर्धशतके झळकावली असती तर, केएल राहुलबद्दल असेच म्हटले असते का? जेव्हा तुम्ही विश्वचषक जिंकण्याच्या तयारीत असता तेव्हा तुम्ही नावं बघत नाही, तर तुम्हाला ट्रॉफी मिळवून देणाऱ्या खेळाडूचा फॉर्म बघयला हवा, असे गौतम गंभीरने म्हटले आहे.

हेही वाचा – Udayanidhi Stalin यांनी सनातन धर्माची केली डेंग्यू-मलेरियाशी तुलना; कोण आहे उदयनिधी?

पावसामुळे भारत-पाकिस्तान सामना अनिर्णित

दरम्यान, भारत-पाकिस्तान सामन्यात कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी निर्णय घेतला, मात्र भारताची खराब सुरूवात झाली. अवघ्या 66 धावांवर भारताने आपल्या 4 विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर इशान किशन आणि हार्दिक पांड्या यांनी पाचव्या विकेटसाठी 138 धावांची भागिदारी केली. यावेळी इशान किशनने 81 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 82 धावांची खेळी केली तर, हार्दिक पांड्याने 87 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 90 धावांची खेळी केली. त्यामुळे भारताने सर्वबाद 266 धावा केल्या.

- Advertisment -