नवी दिल्ली : आशिया चषक 2023 ला उद्यापासून (ता. 30 ऑगस्ट) सुरुवात होणार आहे. हायब्रिड मॉडेलनुसार खेळवल्या जाणाऱ्या आशिया चषकात पहिला सामना पाकिस्तान आणि नेपाळ संघात खेळवला जाणार आहे. यंदाचा आशिया चषक एकदिवसीय फॉर्मेटमध्ये खेळवला जाणार आहे. सहा संघामध्ये ही आशिया चषक स्पर्धा रंगणार असून भारतीय संघाचे सर्व सामने श्रीलंकामध्ये होणार आहे. ग्रुप ‘अ’ मध्ये भारत, पाकिस्तान आणि नेपाळ संघाचा समावेश आहे. तर, ग्रुप ‘ब’ मध्ये बांगलादेश, अफगाणिस्तान आणि श्रीलंका संघ असतील. आशिया चषकाचे चार सामने पाकिस्तानमध्ये होणार आहेत तर, 9 सामने श्रीलंकामध्ये खेळवले जाणार आहेत. परंतु, चषकाच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये के. एल. राहुल खेळणार नसल्याचे समोर आले आहे. याबाबतची माहिती संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याकडून देण्यात आली आहे. (Asia Cup 2023 Ishan kishan get chance instead of K. L. Rahul)
हेही वाचा – Asia Cup 2023 : श्रीलंकेला मोठा धक्का; आशिया चषकातून चार मोठे खेळाडू बाहेर
आज (ता. 29 ऑगस्ट) भारतीय संघ आशिया चषक स्पर्धेसाठी कोलम्बो येथे रवाना होणार आहे. या स्पर्धेतील भारताचा पहिला सामना हा 2 सप्टेंबरला पाकिस्तानच्या विरोधात होणार आहे. त्यामुळे या सामन्याकडे सर्व क्रिकेट रसिकांचे लक्ष लागून राहिलेले आहे. परंतु, सराव सामन्यामध्ये चांगली कामगिरी करून सुद्धा के. एल. राहुल याला पहिल्या दोन सामन्यांमधून वगळण्यात आले आहे. त्यामुळे त्याच्याऐवजी इशान किशानला संघात खेळण्याची संधी मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. दुखापतीच्या कारणास्तव राहुलला दोन सामन्यांमध्ये खेळता येणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. के. एल. राहुल आणि श्रेयस अय्यर हे दोघेही दुकापतीतून सावरत असतानाच सराव सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करत असल्याचे पाहायला मिळाले. ज्यामुळे भारतीय क्रिकेट चाहते आनंदी झाले होते.
परंतु, आता के. एल. राहुल यांना पहिले दोन सामने खेळता येणार नसल्याचे राहुल द्रविड यांनी सांगितले. याबाबतची माहिती राहुल द्रविड यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, लोकेश राहुलने फलंदाजी चांगली केली, यष्टिंमागेही चांगला खेळ त्याने केला आहे. त्याच्या तंदुरुस्तीत चांगली सुधारणा आहे, परंतु वर्ल्ड कप स्पर्धा डोळ्यासमोर आहे. त्यामुळे त्याला लगेच मॅच खेळण्यास उतरवणे, धोकादायक ठरेल. पण, तो पहिल्या दोन सामन्यांत खेळणार नाही. श्रेयस अय्यर पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि त्याने दमदार फलंदाजी केली.
UPDATE
KL Rahul is progressing really well but will not be available for India’s first two matches – against Pakistan and Nepal – of the #AsiaCup2023: Head Coach Rahul Dravid#TeamIndia
— BCCI (@BCCI) August 29, 2023
आशिया चषकासाठी भारतीय संघ
रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, इशान किशन, शार्दूल ठाकूर, अक्षर पटेल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्णा