Eco friendly bappa Competition
घर क्रीडा Asia Cup 2023 : श्रीलंकेविरुद्ध भारताच्या विजयासाठी पाकिस्तानकडून प्रार्थना; हे आहे कारण?

Asia Cup 2023 : श्रीलंकेविरुद्ध भारताच्या विजयासाठी पाकिस्तानकडून प्रार्थना; हे आहे कारण?

Subscribe

Asia Cup 2023 : आशिया चषक (Asia Cup 2023) सुपर-4 च्या सामन्यात आज (12 सप्टेंबर) भारत (India) आणि श्रीलंका (Sri Lanka) संघ कोलंबोच्या (Colambo) आर प्रेमदासा स्टेडियमवर (R Premadasa Stadium) आमनेसामने आहेत. दोन्ही संघांकडे अंतिम फेरी गाठण्याची मजबूत संधी आहे. मात्र या सामन्यावर पाकिस्तान संघाचीही नजर आहे. हा सामना भारतीय संघाने जिंकावा, अशी पाकिस्तान संघाची इच्छा आहे. कारण बांग्लादेश संघ अंतिम फेरीच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे. (Asia Cup 2023 Pakistan prays for Indias win against Sri Lanka Is this because)

सुपर-4 मधील गुणतालिकेतील प्रत्येक संघाचे स्थान

आशिय चषक 2023  स्पर्धेतील सुपर-4 च्या गुणतालिकेत भारतीय संघ पहिल्या स्थानावर आहे. भारतीय संघाने एका सामन्यात विजय मिळवला असून दोन गुण आहेत आणि त्यांचे +4.560 एवढा रनरेट आहे. तर दुसरीकडे श्रीलंका संघाचेही एका विजयासह दोन गुण आहेत. मात्र +0.420 रनरेटमुळे ते दुसऱ्या स्थानावर आहेत. पाकिस्तान संघ तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी दोन सामने खेळले असून एका सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे ते दोन गुणांसह -1.892 रनरेटसह तिसऱ्या स्थानावर आहेत. याशिवाय बांग्लादेश संघाला दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे ते -0.749 रनरेटसह चौथ्या स्थानावर म्हणजेच तळाला आहेत. त्यामुळे ते अंतिम फेरीच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आजच्या सामन्याच्या निकालाचा इतर संघांवर किती परिणाम होईल, याबद्दल जाणून घेऊया.

- Advertisement -

हेही वाचा – IND vs PAK: पराभवानंतर बाबर आझम संतापला, चाहत्यांवर काढला राग ; पाहा व्हिडीओ

1. भारताने श्रीलंकेचा पराभव केल्यास काय होईल?

पाकिस्तानविरुद्धच्या मोठ्या विजयानंतर भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे. त्यामुळे आज भारतीय संघाने श्रीलंकेचा पराभव केल्यास त्यांना अंतिम फेरीतील स्थान निश्चित करता येणार आहे. अशा परिस्थितीत बांगलादेश संघ आशिया चषक स्पर्धेतून बाहेर पडले. यानंतर उपांत्य फेरीसाठी पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात सामना होईल. जो संघ जिंकेल तो अंतिम फेरीत भारतासमोर आमनेसामने येईल. मात्र गुरूवारी होणारा उपांत्य फेरीतील सामना पावसामुळे सामना रद्द झाल्यास श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील चांगला नेट रनरेट असलेला संघ अंतिम फेरीत भारताविरुद्ध खेळेल. अशा परिस्थितीत श्रीलंकेला जास्त संधी आहे, कारण त्यांचा चांगला रनरेट आहे.

- Advertisement -

हेही वाचा – India VS Pakistan: आम्ही बॉम्ब घेऊनच बसलोय का? पाकिस्तानी क्रिकेटप्रेमींनी व्यक्त केला संताप

2. श्रीलंकेने भारताचा पराभव केल्यास काय होईल?

श्रीलंका संघाने आजच्या सामन्यात भारताचा पराभव केल्यास त्यांना अंतिम फेरी गाठता येणार नाही. ते चार गुण मिळवतील मात्र त्यांचा नेट रन रेटमध्ये भारतापेक्षा खूप मागे आहे. अशा स्थितीत त्यांना पाकिस्तानविरुद्धच्या पुढील सामन्यात कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागेल. तसेच भारतालाही बांग्लादेशविरुद्धच्या पुढील सामना जिंकावा लागणार आहे. तरच ते अंतिम फेरीत पोहचू शकतील.  या पराभवानंतर भारताला पुढील सामन्यात बांगलादेशचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश मिळू शकतो.

पाकिस्तान, बांग्लादेशलाही अंतिम फेरीची संधी?

पाकिस्तानला अंतिम फेरीत पोहचायचे असेल तर त्यांना श्रीलंकेविरुद्ध मोठा विजय आवश्यक आहे. याशिवाय त्यांनी भारत विरुद्ध बांग्लादेश सामन्यात भारताचा पराभव किंवा सामना रद्द व्हावा अशी प्रार्थना करावी लागले. तसेच श्रीलंका संघाने आज भारताचा पराभव केल्यास बांगलादेश संघालाही अंतिम फेरीची संधी असणार आहे. अंतिम फेरीमध्ये पोहचण्यासाठी बांग्लादेश संघाला भारताविरुद्ध मोठा विजय मिळवणे आवश्यक आहे आणि पाकिस्तानला श्रीलंकेविरुद्ध पराभव पत्करावा लागेल. जर श्रीलंका संघाने आज भारताचा 150 धावांनी पराभव केला तर, बांग्लादेश संघाला नेट रनरेटमध्ये आघाडी घेण्यासाठी भारताचा 125 धावांनी पराभव करावा लागेल.

हेही वाचा  – एमएस धोनी फॅन्सकडे मागतो चॉकलेटचा डबा; ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

3. पावसामुळे भारत- श्रीलंका सामना रद्द झाल्यास काय होईल?

भारत आणि श्रीलंका यांच्यातील आजचा सामना पावसामुळे रद्द झाल्यास बांगलादेशचा संघ अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडेल. सामना रद्द झाल्यामुळे पाकिस्तानची स्थिती चांगली होईल. श्रीलंकेला हरवून पाकिस्तान संघ अंतिम फेरी गाठू शकते. मात्र पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला तर तेही अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडतील. तसेच भारतीय संघ बांग्लादेशविरुद्ध पराभूत झाला तरी ते तीन गुणांसह अंतिम फेरीत प्रवेश करू शकतील. तसेच भारत-श्रीलंका, पाकिस्तान-श्रीलंका आणि भारत-बांगलादेश हे तिन्ही सामने पावसामुळे रद्द झाल्यास भारत आणि श्रीलंका संघ आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत आमनेसामने येतील.

- Advertisment -