Eco friendly bappa Competition
घर क्रीडा रंगारंग कार्यक्रमाने आशिया कपला सुरुवात; पहिली लढत पाक विरुद्ध नेपाळ

रंगारंग कार्यक्रमाने आशिया कपला सुरुवात; पहिली लढत पाक विरुद्ध नेपाळ

Subscribe

पाकिस्तानमधील मुल्तानच्या मैदानावर आशिया चषकाला सुरुवात झाली आहे. यामध्ये पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यामध्ये सलामीच्या सामना सुरू आहे.

नवी दिल्ली : मिनी वर्डकप म्हणून ओळख असलेल्या आशिया चषक 2023 ला दिमाखदार सोहळ्यानंतर सुरुवात झाली आहे. या चषकातील पहिलाच सामना यजमान पाकिस्तानविरुद्ध पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आलेल्या नेपाळमध्ये रंगत आहे. सध्या हा सामना सुरू असून, 2 सप्टेंबर रोजी भारताचा सामना रंगणार आहे. (Asia Cup begins with colorful program; First match in Pakistan vs Nepal)

पाकिस्तानमधील मुल्तानच्या मैदानावर आशिया चषकाला सुरुवात झाली आहे. यामध्ये पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यामध्ये सलामीच्या सामना सुरू आहे. नेपाळपुढे तगड्या पाकिस्तानचे आव्हान असून पाकिस्तानचा अनुभवी कर्णधार बाबर आझमपुढे नेपाळचा कर्णधार रोहितचा संघ उभा ठाकला आहे.

नाणेफेक जिंकत पाकिस्तानने घेतला फलंदाजीचा निर्णय

- Advertisement -

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. नेपाळचा संघ प्रथमच पाकिस्तानविरुद्ध खेळत आहे. दोन्ही संघांना आशिया चषक स्पर्धेत अ गटात ठेवण्यात आले आहे. यामध्ये भारतीय संघाचाही समावेश आहे.

हेही वाचा : ‘इंडिया’च्या बैठकीत किमान समान कार्यक्रमावर चर्चा होण्याची शक्यता-शरद पवार

कर्णधार बाबर आझमने ठोकले शतक

- Advertisement -

बाबर आझमने नेपाळविरुद्धच्या आशिया कपच्या पहिल्या सामन्यात शानदार शतक झळकावले. बाबरने कारकिर्दीतील 19वे शतक झळकावले आहे. त्याने 42 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर दोन धावा घेत शतक पूर्ण केले. दुसरीकडे इफ्तिखार अहमदने अर्धशतक झळकावले. पाकिस्तानने 42 षटकात 4 विकेट गमावत 228 धावा केल्या.

पाकिस्तानमध्ये चार तर श्रीलंकेत 9 सामने

आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेल्या विविध घडामोडीनंतर भारताने पाकिस्तानात जाऊन सामने खेळण्यास नकार दिला. यंदाच्या आशिया चषकाचे यजमानपद पाकिस्तानकडे होते. त्यानंतर ही स्पर्धा हायब्रिड पद्धतीने खेळवली जाईल, असे निश्चित झाले. याअंतर्गत मुल्तान आणि लाहोर येथे आशिया चषकाचे 4 सामने खेळले जातील, तर श्रीलंकेत 9 सामने होतील.

हेही वाचा : शेतकऱ्यांच्या नजरा पुन्हा आभाळाकडे; राज्यात पावसाची तूट

पाकिस्तान ठरला होता उपविजेता

2018 नंतर प्रथमच आशिया चषक एकदिवसीय फॉर्मेटमध्ये खेळवला जाणार आहे. आशिया चषक 2022 चा शेवटचे सीझन T20 फॉरमॅटमध्ये खेळला गेले होते. यामध्ये पाकिस्तान संघ श्रीलंकेकडून पराभूत होऊन उपविजेता ठरला होता.

- Advertisment -