घरक्रीडाAsia Cup Hockey: भारताने इंडोनेशियाला केले पराभूत; नॉकआऊटमध्ये प्रवेश निश्चित

Asia Cup Hockey: भारताने इंडोनेशियाला केले पराभूत; नॉकआऊटमध्ये प्रवेश निश्चित

Subscribe

आशिया कप हॉकी (Asia Cup Hockey) स्पर्धेत गतिविजेत्या भारतीय हॉकी संघाने 16-0 ने इंडोनेशियाचा (India vs Indonesia) पराभूत केले आहे. या विजयासोबतच भारताचं नॉकआऊट स्टेजमधले स्थान निश्चित झाले आहे.

आशिया कप हॉकी (Asia Cup Hockey) स्पर्धेत गतिविजेत्या भारतीय हॉकी संघाने 16-0 ने इंडोनेशियाचा (India vs Indonesia) पराभूत केले आहे. या विजयासोबतच भारताचं नॉकआऊट स्टेजमधले स्थान निश्चित झाले आहे. विशेष म्हणजे भारताच्या विजयामुळे पाकिस्तानच्या हॉकी संघाला (Pakistan) मोठा फटका बसला असून, पाकिस्तानचा संघ आशिया कपमधून बाहेर गेला आहे.

पहिल्या दोन क्वार्टरमध्ये भारताने 6 गोल केले. त्यानंतर गोलचा सतत गोल करत भारताने एकूण 10 गोल केले. भारताकडून दिस्पान तिर्कीने 5 आणि सुदेवला 3 गोल करण्यात यश आले.

- Advertisement -

या विजयानंतर पुढील सामना म्हणजेच सुपर-4 मध्ये भारताचा सामना जपानविरुद्ध होणार आहे. हा सामना 28 मे रोजी होणार आहे. भारताला स्पर्धेत पुढे जाण्यासाठी इंडोनेशियाविरुद्ध कमीत कमी 15 गोलच्या फरकाने जिंकणे गरजेचे होते. मात्र, भारतीय हॉकी संघाने एक गोल जास्त करत पाकिस्तानला नॉक आऊटमध्ये पोहोचण्यापासून रोखले.

आशिया कप हॉकीचा पहिला सामना अनिर्णित

- Advertisement -

भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातला आशिया कप हॉकीचा (Asia Cup Hockey) पहिला सामना 1-1 ने अनिर्णित राहिला. गतविजेत्या भारताने शेवटच्या क्षणांमध्ये गोल गमावल्यामुळे हा सामना अनिर्णित राहिला. भारताचा पुढचा सामना आता मंगळवारी जपानविरुद्ध होणार आहे. जपानने याआधी इंडोनेशियाचा 9-0 ने पराभव केला आहे.

पाकिस्तानला सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटाला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला होता. मात्र, त्यांना गोल करता आला नसून, काही सेकंदांनंतर भारतालाही पेनल्टी कॉर्नरची संधी चालून आली. परंतु नीलम संदीप सेसचा शॉट पाकिस्तानी गोलकीपर अकमल हुसैनने वाचवला.


हेही वाचा – युवा खेळाडूने इंग्लंडच्या ‘या’ अनुभवी खेळाडूला बाद करत केले स्वप्न पूर्ण; व्हिडीओ व्हायरल

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -