घर क्रीडा Asia Cup India Squad : आशिया चषकासाठी भारतीय संघ जाहीर, तिलक वर्माला...

Asia Cup India Squad : आशिया चषकासाठी भारतीय संघ जाहीर, तिलक वर्माला संधी, तर ‘हा’ खेळाडू बाहेर

Subscribe

Asia Cup India Squad : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या आशिया चषक 2023 साठी (Asia cup 2023) आज (21 ऑगस्ट) भारतीय संघाची घोषणा केली आहे. केएल राहुल आणि श्रेयस अय्यरचे भारतीय संघात पुनरागमन झाले असून जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा देखील एकदिवसीय संघात पुनरागमन करत आहेत. विशेष म्हणजे तिलक वर्मा या नव्या खेळाडूला संघात स्थान देण्यात आले आहे. (Asia Cup India Squad India squad announced for Asia Cup Tilak Verma gets chance this player out)

30 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या आशिया चषक स्पर्धेसाठी अनेक देशांनी आपापल्या संघांची घोषणा केली होती. त्यानंतर आता भारतीय संघाने आपला संघ जाहीर केला आहे. निवड समितीने 18 खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. 17 खेळाडूंचा संघ असून संजू सॅमसन बॅकअप यष्टिरक्षक असेल. अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने तिलक वर्माची निवड करून सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे. तिलक वर्माने नुकत्याच पार पडलेल्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर आता त्याला आशिया चषकासाठी संधी देण्यात आली आहे. मात्र फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल आणि आर. अश्विन या अनुभवी खेळाडूंना निवडी समितीने बाहेर बसवले आहे.

- Advertisement -

 

- Advertisement -

आशिया चषक 30 ऑगस्टपासून सुरू होत आहे. या स्पर्धेसाठी यष्टिरक्षक फलंदाज केएल राहुल आणि श्रेयस अय्यर दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन करताना दिसत आहेत. तसेच हार्दिक पांड्या आणि शार्दूल ठाकूर यांची अष्टपैलू खेळाडू म्हणून भारतीय संघात निवड करण्यात आली आहे तर, प्रसिद्ध कृष्ण याला आशिया चषकात संधी देण्यात आली आहे. त्यामुळे तो मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह यांच्यासोबत वेगवान मारा करताना दिसणार आहे. युजवेंद्र चहल आणि आर. अश्विन यांना संधी दिलेली नाही.

हेही वाचा – India vs Ireland 2nd T20 : भारताने आयर्लंडचा केला दारुण पराभव; बुमराहच्या नेतृत्वाखाली पहिली मालिका जिंकली

आशिया चषकासाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.

आशिया चषकावर भारताचा दबदबा

आशिया चषकाच्या इतिहासात भारतीय संघाचा दबदबा राहिला आहे. स्पर्धेच्या इतिहासात आतापर्यंत 15 हंगाम खेळले गेले आहेत. यापैकी भारतीय संघाने सर्वाधिक 7 वेळा (1984, 1988, 1990-91, 1995, 2010, 2016, 2018) विजेतेपद पटकावले आहे. त्याचबरोबर श्रीलंकेने सहा (1986, 1997, 2004, 2008, 2014, 2022) विजेतेपदे जिंकली आहेत. पाकिस्तानचा संघ फक्त दोनदा (2000, 2012) आशिया चषक आपल्या नावावर करू शकला आहे.

हेही वाचा – Chandrayaan-3 : चंद्राच्या जवळ पोहोचलेल्या चांद्रयान -3ने पाठविली आनोखी छायाचित्रे

भारत-पाकिस्तान सामना कधी?

भारतीय क्रिकेट संघ आशिया चषक 2023 स्पर्धेत आपला पहिला सामना 2 सप्टेंबर रोजी श्रीलंकेतील कँडी येथे कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. यानंतर भारताला 4 सप्टेंबरला नेपाळविरुद्ध दुसरा सामना खेळायचा आहे. भारत, पाकिस्तान आणि नेपाळ हे संघ गट अ मध्ये आहेत. ब गटात श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या संघांचा समावेश आहे.

आशिया चषक 2023 चे वेळापत्रक

30 ऑगस्ट : पाकिस्तान विरुद्ध नेपाळ – मुलतान
31 ऑगस्ट : बांगलादेश विरुद्ध श्रीलंका – कॅंडी
2 सप्टेंबर : भारत विरुद्ध पाकिस्तान – कॅंडी
3 सप्टेंबर : बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान – लाहोर
4 सप्टेंबर : भारत विरुद्ध नेपाळ – कॅंडी
5 सप्टेंबर : श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान – लाहोर

- Advertisment -