घरक्रीडाAsia Cup - Ind vs Hkg Live Updates : हाँगकाँगची दमदार सुरूवात,...

Asia Cup – Ind vs Hkg Live Updates : हाँगकाँगची दमदार सुरूवात, बिनबाद १५२

Subscribe

आशिया चषकात आज भारताचा पहिला सामना हाँग काँगशी आहे. या सामन्यात भारताने काही नवीन खेळाडूंना संधी दिली आहे.

  • नझाकत खानसोबतच अंशुमन राठीनेही आपले अर्धशतक पूर्ण केले आहे.
  • हाँगकाँगचे सलामीवीर नझाकत खान आणि अंशुमन राठ यांनी अप्रतिम सुरुवात केली आहे. नझाकत खानने आपले अर्धशतक पूर्ण केले आहे.
  • भारतातर्फे शिखर धवनने सर्वाधिक १२७ धावा केल्या. त्याला रायडूने ६० धावा करत चांगली साथ दिली. हाँगकाँगकडून किंचित शाह याने ३ विकेट घेतल्या.
  • शिखर धवन बाद झाल्यानंतर भारताच्या इतर फलंदाजांना चांगली फलंदाजी करता आली नाही. त्यामुळे भारताला २८५ धावांपर्यंतच मजल मारता आली. 
  • शिखर धवन (१२७) आणि धोनी (०) पाठोपाठ माघारी परतले आहेत. आता भारताच्या डावाची भिस्त कार्तिक आणि केदार जाधववर आहे.
  • शिखर धवनने आपल्या कारकिर्दीतील १४ वे शतक झळकावले आहे. त्यामुळे भारताचे द्विशतक पूर्ण झाले आहे.
  • आशिया चषकात पुनरागमन करणाऱ्या अंबाती रायडूने अर्धशतक केले. पण ६० धावांवर त्याला एहसान नवाझने बाद केले.
  • रोहितची विकेट लवकर गमावल्यानंतर धवन आणि रायडू यांनी भारताचा डाव सावरला आहे. या दोघांनीही आपले अर्धशतक पूर्ण केले.
  • भारताची चांगली सुरुवात झाली पण कर्णधार रोहित शर्मा २३ धावांवर बाद झाला.
  • भारत आणि हाँग काँगमधील सामन्यात हाँग काँगने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारताने या सामन्यात डावखुरा वेगवान गोलंदाज खलील अहमदला पदार्पणाची संधी दिली आहे. 
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -