घरक्रीडाअखेर ठिकाण ठरलं! आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन 'यूएई'मध्ये होणार

अखेर ठिकाण ठरलं! आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन ‘यूएई’मध्ये होणार

Subscribe

श्रीलंकेमध्ये खेळवली जाणारी आशिया चषक क्रिकेट स्पर्धा आता संयुक्त अरब अमिराती (यूएई)मध्ये होणार आहे. याबाबच बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी माहिती दिली आहे.

श्रीलंकेमध्ये खेळवली जाणारी आशिया चषक क्रिकेट स्पर्धा आता संयुक्त अरब अमिराती (यूएई)मध्ये होणार आहे. याबाबच बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी माहिती दिली आहे. आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचे ठिकाण ठरल्यानंतर वेळापत्रकही समोर आले आहे. त्यानुसार ही स्पर्धा २६ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. मुख्य स्पर्धेपूर्वी एक पात्रता फेरी होणार आहे. (Asia Cup Will Be Held In Uae Bcci Chief Sourav Ganguly information)

श्रीलंकेत सध्या राजकीय आणि आर्थिक संकट ओढावले आहे. नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अन्नधान्य आणि इंधनाचाही मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे आशिया चषक क्रिटेट स्पर्धा श्रीलंकेत खेळवणे योग्य ठरणार नाही, असा विचार बीसीसीआयने केला आहे. याच कारणात्सव ही स्पर्धा श्रीलंकाऐवजी यूएई येथे खेळवली जाणार आहे.

- Advertisement -

“सध्या या काळात यूएईमध्ये पाऊस नसतो. त्यामुळे यूएई हेच आशिया चषक स्पर्धेसाठी योग्य असेल”, असे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी म्हटले. दरम्यान, याआधी ही स्पर्धा यूएईमध्ये खेळवली जाऊ शकते, असे संकेत श्रीलंका क्रिकेट संघटनेचे सचिव मोहन डिसिल्वा यांनी दिले होते. त्यानुसार, “आशिया चषक स्पर्धा संयुक्त अरब अमिराती येथे हलवण्यात येण्याची शक्यता आहे”, असे डिसिल्वा म्हणाले होते.

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचे ठिकाण आणि वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यानुसार, ही स्पर्धा २६ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. तसेच, मुख्य स्पर्धेपूर्वी एक पात्रता फेरी होणार आहे. यामध्ये हाँगकाँग, सिंगापूर, कुवेत आणि यूएईचे संघ पात्रता एकमेकांना आव्हान देणार आहेत. अफगाणिस्तान, पाकिस्तान, भारत, श्रीलंका आणि बांगलादेश हे पाच पूर्ण सदस्य संघ थेट प्रवेशासाठी पात्र आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – BCCIकडून भारतीय संघाच्या मँचेस्टर ते पोर्ट ऑफ स्पेनपर्यंतच्या प्रवासाला कोटींचा खर्च

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -