घरक्रीडाआशियाई एअरगन चॅम्पियनशिप स्पर्धा

आशियाई एअरगन चॅम्पियनशिप स्पर्धा

Subscribe

भारताच्या सौरभ चौधरी आणि मनू भाकर या युवा नेमबाजांच्या जोडीने चीन तैपेई येथे सुरु असलेल्या आशियाई एअरगन चॅम्पियनशिप स्पर्धेत १० मीटर पिस्तूलच्या मिश्र गटात विश्वविक्रमी कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. याच जोडीने एक महिन्याआधीच नवी दिल्लीत झालेल्या नेमबाजी विश्वचषकात सुवर्णपदक मिळवले होते.

१७ वर्षीय मनू आणि १६ वर्षीय सौरभने मिळून पात्रता फेरीत ७८४ गुणांची कमाई केली. त्यामुळे त्यांनी रशियाच्या जोडीचा विक्रम मोडीत काढला. काही दिवसांपूर्वीच रशियाच्या व्हिटॅलीना बॅट्सरशकिना आणि आर्टेम चेर्नोसोव या जोडीने युरोपियन चॅम्पियनशिप स्पर्धेत हा विक्रम केला होता. मनू आणि सौरभ या जोडीने पाच संघांचा समावेश असलेली अंतिम फेरी ४८४.८ गुण कमावत जिंकली व सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.

- Advertisement -

या स्पर्धेत कोरियन जोडी हवांग सीऑनगीउन आणि किम मोस यांनी ४८१.१ गुणांसह रौप्य तर चीन तैपेईची जोडी वू चिआ यिंग आणि कुन-टिंग यांनी ४१३.३ गुणांसह कांस्यपदक मिळवले. याच प्रकारात भारताच्या अनुराधा आणि अभिषेक वर्मा जोडीने अंतिम फेरी गाठली होती. मात्र त्यांना ३७२.१ गुणांसह चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -