घरक्रीडाआशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा

आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा

Subscribe

पी. यू. चित्राने आशियाई अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी भारताच्या खात्यात तिसर्‍या सुवर्णपदकाची भर घातली. चित्राने १५०० मीटर धावण्याच्या शर्यतीत ४ मिनिटे व १४.५६ सेकंद अशी वेळ नोंदवत हे सुवर्ण मिळविले. चित्राचे हे सलग दुसरे सुवर्ण होते. २०१७ मध्ये भुवनेश्वरला झालेल्या आशियाई स्पर्धेतही चित्राने सुवर्ण पटकावले होते. त्या वेळी चित्राने ४ मिनिटे व १७.९२ सेकंद वेळ नोंदविली होती.

चित्राच्या या पदकामुळे स्पर्धेअखेरीस भारताच्या खात्यात एकूण १७ पदके होती. यामध्ये ३ सुवर्ण, ७ रौप्य आणि ७ कांस्यपदकांचा समावेश होता. याआधी २०१७ मध्ये भारतात झालेल्या या स्पर्धेत यजमान भारताने एकूण २९ पदके मिळवली होती. त्यामुळे यावर्षी भारताला अपेक्षित कामगिरी करता आली नाही असे म्हणता येईल.

- Advertisement -

या स्पर्धेच्या अखेरीस पदक तक्त्यात बहारीन अव्वल स्थानी होता. त्यांनी एकूण २२ पदके जिंकली, जी दुसर्‍या स्थानी असलेल्या चीनने पटकावलेल्या २९ पदकांपेक्षा कमी होती. मात्र, त्यांनी ११ सुवर्णपदके मिळवत हे अव्वल स्थान मिळवले. चीन २९ पदकांसह (९ सुवर्ण, १३ रौप्य, ७ कांस्य) दुसर्‍या स्थानी तर जपान १८ पदकांसह (५ सुवर्ण, ४ रौप्य, ९ कांस्य) तिसर्‍या स्थानी राहिला.

भारताकडून या स्पर्धेत पी. यू. चित्रा (१५०० मीटर धावणे), गोमथी मारीमुथू (८०० मीटर धावणे) आणि तजिंदरपाल सिंग तूर (गोळाफेक) यांनी सुवर्णपदके मिळवली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -