घरक्रीडाAsian Champions Trophy 2021: भारताने जपानचा ६-० ने केला पराभव; आता उपांत्यफेरीकडे...

Asian Champions Trophy 2021: भारताने जपानचा ६-० ने केला पराभव; आता उपांत्यफेरीकडे लक्ष

Subscribe

आशियाई चॅम्पियनशिप ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत आपले स्थान पक्के करणाऱ्या गतविजेत्या भारतीय हॉकी संघाने राऊंड रॉबिन लीगच्या शेवटच्या सामन्यात जपानला धूळ चारली आहे

आशियाई चॅम्पियनशिप ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत आपले स्थान पक्के करणाऱ्या गतविजेत्या भारतीय हॉकी संघाने राऊंड रॉबिन लीगच्या शेवटच्या सामन्यात जपानला धूळ चारली आहे. या स्पर्धेतील भारतीय संघाच्या चमकदार खेळीचे प्रदर्शन अद्याप चालू आहे. उपांत्यफेरीत जागा निश्चित केलेल्या भारतीय संघाने रविवारी जपानचा मोठ्या फरकाने पराभव केला. भारतीय संघाने शानदार खेळी करून जपानच्या संघाला ६-० च्या मोठ्या फरकाने पराभूत केले आणि एकतर्फी सामन्यात संघाची ताकद दाखवून दिली. भारतीय संघासाठी या सामन्यात हरमनप्रीत सिंग हिरो ठरला. भारतीय संघाने नेहमी प्रमाणेच या सामन्यात देखील सुरूवातीपासूनच प्रतिस्पर्धी संघावर दबाव राखून ठेवला होता.

भारताकडून पहिला गोल हरमनप्रीतने केला. सामना सुरू झाल्यानंतर काही वेळातच भारतीय संघाला लागोपाठ दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले. मात्र हरमनप्रीत त्यांचा फायदा घेऊ शकला नाही. भारतीय संघाचे शानदार प्रदर्शन सुरूवातीपासूनच सुरू होते. जपानचा संघ पेनल्टी कॉर्नरचा फायदा घेण्यात अपयशी झाला की भारतीय संघाने आक्रमक खेळी केली. याचाच फायदा घेत दिलप्रीतने भारताकडून दुसरा गोल केला आणि भारताने सामन्यात २-० अशी आघाडी घेतली. दरम्यान, तिसरा क्वार्टर सुरू झाल्यानंतर भारताने जपानवर आणखी दबाव टाकला. जरमनप्रीतने शानदार खेळी करत फिल्ड गोल केला आणि भारताला ३-० ची आघाडी मिळवून दिली.

- Advertisement -

दरम्यान, सुमित नेनमने त्याचा पहिला आणि संघाचा चौथा गोल केला. तेव्हा भारताने ४-० ने आघाडी घेतली होती. अशातच हरमनप्रीतने सामना संपण्याच्या ७ मिनिटांपूर्वी शानदार गोल केला आणि भारताला ५-० अशी आघाडी मिळवून देत विजयाकडे कूच केली. हरमनप्रीतचा या सामन्यातील हा दुसरा गोल ठराल. लक्षणीय बाब म्हणजे पाचवा गोल केल्यानंतर एका मिनिटांतच शमशेर सिंगने त्याचा पहिला गोल करून संघाचा ६-० ने विजय निश्चित केला. भारताचा या स्पर्धेतील विजयरथ अद्याप चालू आहे. भारताचा कोरियाविरूध्दचा सामना बरोबरीचा ठरला होता. तो अपवाद वगळता भारतीय संघाने सलग तीन सामने जिंकले आहेत.

- Advertisement -

भारताचा संघ

मनप्रीत सिंग (कर्णधार), सूरज हेरेरा (गोलकीपर), वरुण कुमार, हरमनप्रीत सिंग, जर्मनप्रीत सिंग, नीलम संजीप, हार्दिक सिंग, शमशेर सिंग, सुमित, गुरसाहिबजीत सिंग, ललित कुमार उपाध्याय,


हे ही वाचा: http://Missing Chinese Player case : चीनी पत्रकाराने पेंग शुईचा नवीन व्हिडिओ केला शेअर; खेळाशी संबंधित कार्यक्रमात नोंदवला सहभाग


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -