घरक्रीडाAsian Champions Trophy 2021: भारताने पाकिस्तानचा ४-३ ने केला पराभव; कांस्य पदकावर...

Asian Champions Trophy 2021: भारताने पाकिस्तानचा ४-३ ने केला पराभव; कांस्य पदकावर केला कब्जा

Subscribe

भारतीय संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रोमांचक सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानचा ४-३ असा पराभव केला आहे

भारतीय संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या रोमांचक सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानचा ४-३ असा पराभव केला आहे. या सामन्यातील विजयासह भारतीय संघाने केवळ कांस्यपदकावरच कब्जा केला नाही तर या स्पर्धेतील गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले. तर पाकिस्तानचा संघ चौथ्या क्रमांकावर राहिला आहे. दरम्यान हा सामना सुरूवातीपासूनच बरोबरीत चालला होता. सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये दोन्ही संघामध्ये जोरदार संघर्ष पहायला मिळाला. लक्षणीय बाब म्हणजे सामन्याच्या तिसऱ्याच मिनिटांत भारतीय संघाने शानदार गोल करून सामन्यातील आपले खाते उघडले. पहिला गोल हरमनप्रीतने पेनल्टी कॉर्नरवर केला आणि भारतीय संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली.

दरम्यान, पाकिस्ताननेही हार न मानता पुनरागमन करत गोल केला आणि गुणसंख्येत १-१ अशी बरोबरी साधली. हा गोल अफराझने काउंटर आक्रमण करत केला. सामन्याच्या तिसऱ्या हाफमध्ये पाकिस्तानने शानदार आक्रमण केले. अब्दुल राणाने पाकिस्तानसाठी दुसरा गोल अगदी सहज करत संघाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. तर तिसरा क्वार्टर संपण्यापूर्वी भारताने सामन्यात जबरदस्त पुनरागमन केले. वेळ संपण्यापूर्वी सुमितने गोल करून भारताचे सामन्यात पुनरागमन केले.

- Advertisement -

शेवटच्या क्वार्टरमध्ये पाकिस्तानचा पराभव

सामन्याच्या शेवटच्या हाफमध्ये भारतीय संघाने पाकिस्तानला एकही गोल करून दिला नाही. सामना संपण्याच्या ठिक काही वेळापूर्वी भारताने तिसरा गोल केला. वरुण कुमारने पेनल्टी कॉर्नरचा फायदा घेत हा गोल केला. अक्षयदीप सिंगने भारतासाठी चौथा गोल करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

- Advertisement -

आशियाई स्पर्धेत भारताच्या नावावर पाचवे पदक 

२०११ – सुवर्ण पदक
२०१२ – रजत पदक
२०१६ – सुवर्ण पदक
२०१८ – सुवर्ण पदक
२०२१ – कांस्य पदक

आशियाई स्पर्धेत तिन्ही पदक जिंकणारा भारत पहिला देश

भारत – ३ सुवर्ण, १ रजत आणि १ कास्यं
पाकिस्तान – ३ सुवर्ण, २ रजत
जपान – १ रजत
मलेशिया – ५ कांस्य

 

 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -