घर क्रीडा भारतीय हॉकी संघाची अंतिम सामन्यात धडक; उपांत्य फेरीत जपानचा 5-0ने पराभव

भारतीय हॉकी संघाची अंतिम सामन्यात धडक; उपांत्य फेरीत जपानचा 5-0ने पराभव

Subscribe

भारतीय हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 च्या उपांत्य फेरीत (Asian Champions Trophy) जपानचा 5-0 ने पराभव केला. जपानचा पराभव करत भारतीय संघाने या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे. आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2023च्या अंतिम सामन्यात भारताचा सामना मलेशियाशी होणार आहे.

भारतीय हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 च्या उपांत्य फेरीत (Asian Champions Trophy) जपानचा 5-0 ने पराभव केला. जपानचा पराभव करत भारतीय संघाने या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे. आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2023च्या अंतिम सामन्यात भारताचा सामना मलेशियाशी होणार आहे. भारताने हा सामना जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थान पुन्हा पटकावले होते. (asian champions trophy 2023 hockey semi finals india won 5 0 against japan)

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 (Asian Champions Trophy) स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. नुकताच विजय मिळवलेल्या उपांत्या फेरीत भारतीय संघाने सुरुवातीपासूनच वर्चस्व ठवले होते. या सामन्यातील पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांना गोल करता आला नाही. यानंतर अर्शदीप सिंगने खाते उघडले. त्याने 19व्या मिनिटाला गोल केला. हरमनप्रीत सिंगने 23व्या मिनिटाला गोल केला. मनदीप सिंग, सुमित आणि कार्ती सेल्वम यांनीही प्रत्येकी एक गोल केलाविशेष म्हणजे सामन्याच्या पूर्वाधाच्या अखेरीसच भारताने 3-0 अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर उत्तरार्धात 2 गोल करत भारताने जपानविरुद्धचा (India Vs Japan) सामना 5-0 असा जिंकला.

- Advertisement -

याआधी दोन वर्षांपूर्वी ढाका येथे झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात जपानने भारताचा 5-3 असा पराभव केला होता. पण यावेळी भारतीय संघाने चांगली कामगिरी करत करत आपल्या पराभवाची परतफेड केली.

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2023मधील भारतीय संघाची कामगिरी

  • 3 ऑगस्ट रोजी झालेल्या सामन्यात भारताने चीनचाही धुव्वा उडवला होता. या सामन्यात भारताने चीनवर 7-2 असा विजय मिळवला होता.
  • 4 ऑगस्टला जपानसोबतचा सामना 1-1 असा बरोबरीत सुटला.
  • भारतीय संघाने 6 ऑगस्ट रोजी मलेशियावर शानदार विजय मिळवला. त्याने मलेशियाचा 5-0 असा पराभव केला.
  • यानंतर कोरियाचा 3-2 असा पराभव केला.
  • पाकिस्तानचाही 4-0 असा पराभव करत भारताने उपांत्य फेरी गाठली होती.

- Advertisement -

हेही वाचा – Navjot Singh Sidhu : ‘जखमा बऱ्या झाल्या पण…’; कॅन्सरशी लढा देत असलेल्या पत्नीसाठी सिद्धूंनी लिहिली भावनिक पोस्ट

- Advertisment -