घरक्रीडाAsian Games 2018 : महिलांपाठोपाठ पुरुष कबड्डी संघाचीही विजयी सुरूवात

Asian Games 2018 : महिलांपाठोपाठ पुरुष कबड्डी संघाचीही विजयी सुरूवात

Subscribe

एशियाड गेम्स २०१८ मध्ये भारताच्या महिला कबड्डी संघापाठोपाठ आता पुरूष संघानेही आपल्या पहिल्या सामन्यात बांगलादेशवर मात करत विजय मिळवला आहे.

आशिया खेळ २०१८ इंडोनेशियातील जकार्ता आणि पालेबांग येथे सुरू असून भारताने पहिल्या दिवशी आतापर्यंत उत्तम कामगिरी केली आहे. महिला कबड्डी संघापाठोपाठ आता पुरूष संघानेही आपल्या पहिल्या सामन्यात बांगलादेशवर मात करत विजय मिळवला आहे. भारताने बांग्लादेशला ५०-२१ च्या फराकने नमवत विजय आपल्या नावे केला आहे.

- Advertisement -

असा झाला सामना- 

सामन्याच्या सुरूवातीपासूनच भारतीय खेळाडूंनी आक्रमक खेळ सुरू केला. पहिल्या सत्रात भारताने सुरूवातीच्या काही मिनीटातच सामन्यात आघाडी घेतली आणि हाफ टाईम पर्यंत भारताने २०-१२ अशी आघाडी घेत सामन्यात आपले वर्चस्व प्रस्थापीत केले. भारताच्या रायडर्सनी अप्रतिम कामगिरी करत भारताची आघाडी वाढवली आणि सामना ५०-२१ च्या फराकने आपल्या नावे करत विजय मिळवला.

कबड्डी सोबतच भारताने १० मीटर एअर रायफल मिक्स्ड स्पर्धेत पदक मिळवले असून भारताची अपूर्वी चंदेला आणि रवीकुमार यां जोडीने मिक्स्ड स्पर्धेत कांस्य पदक पटकावले आहे.

वाचा – Asian Games 2018 : महिला कबड्डी संघाची विजयी सलामी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -