घरक्रीडाAsian games 2018: भारतीय हॉकी टीमने श्रीलंकेचा २०-० ने केला पराभव

Asian games 2018: भारतीय हॉकी टीमने श्रीलंकेचा २०-० ने केला पराभव

Subscribe

आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष हॉकी टीमने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. भारतीय हॉकी टीमने श्रीलंकेचा २०-० ने पराभव करत सेमी फायनलमध्ये उडी मारली आहे.

जकार्तात सुरु असलेल्या १८ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष हॉकी टीमने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. भारतीय हॉकी टीमने श्रीलंकेचा २०-० ने पराभव करत सेमी फायनलमध्ये उडी मारली आहे. भारताचा साखळी फेरीतील हा पाचवा विजय आहे. २०० वा सामना खेळणाऱ्या रुपिंदर पाल सिंह आणि आकाशदीपने या सामन्यामध्ये भारतासाठी हॅट्रीक केली आहे.

- Advertisement -

असा झाला सामना

भारतीय हॉकी टीमने आजच्या सामन्याची शानदार सुरुवात केली. पहिल्याच मिनिटामध्ये रुपिंदर पाल सिंहने गोल करत १-० स्कोर केला. चौथ्या मिनिटानंतर हरमनप्रीतने गोल करत स्कोर दुप्पट केला. त्यानंतर आकाशदीपने ९ व्या, ११व्या आणि १७ व्या मिनिटाला लागोपाठ गोल करत स्कोर ५-० केला. हरमनप्रीतने २१ व्या आणि आकाशदीप याने पुन्हा २२ व्या मिनिटाला गोल करत मध्यांतरापर्यंत ७-० असा स्कोर केला. या संपूर्ण सामन्यामध्ये मध्यांतरापर्यंत आकाशदीप सिंहने ४ गोल केले.

हॉकी टीमने ५ सामन्यात केले ७६ गोल

भारताच्या हॉकी टीमने पाच सामन्यांमध्ये एकूण ७६ गोल केले आहे. भारताच्या आकाशदीप सिंहने ६ गोल तर रुपिंदर पाल सिंह, हरमनप्रीत आणि मनदीप सिंहने प्रत्येकी ३ गोल केले आहेत. या व्यतिरिक्त उत्तरप्रदेशच्या ललित उपाध्यायने २, दिलप्रीत, अमित आणि विवेकने प्रत्येकी १ गोल केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -