इंडोनेशियात सुरू असलेल्या आशियाई खेळांच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात भारताची सुवर्णकन्या सिंधूने उत्तम केली असून तिने जपानच्या अकाने यामागुचीवर विजय मिळवत पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे. पहिल्या दिवशी बजरंग पुनियाच्या सुवर्णपदकानंतर आता दुसऱ्या दिवशी सिंधूने आपल्या पहिल्याच सामन्यात विजयी सलामी दिली आहे.
असा झाला सामना…
सिंधू आणि अकाने यांच्यातील सामना सुरूवातीपासूनच चुरशीचा होता. अकानेने सुरुवातीलाच आक्रमक खेळ करत सिंधूला मागे टाकले. मात्र काही वेळातच सिंधूनेही आक्रमक पावित्रा घेत पहिला सेट २१-१८ च्या फरकाने आपल्या नावे केला. यानंतर दुसऱ्या सेटमध्ये पुन्हा दोघींनी अप्रतिम खेळ दाखवला. मात्र दुसऱ्या सेटच्या अखेरीस सिंधूने आपला खेळ उंचावत सेट २१-१९ च्या फरकाने जिंकला आणि सामनाही आपल्या नावे केला.
#AsianGames #Badminton@Pvsindhu1 defeats #AkaneYamaguchi of Japan in straight sets to give #TeamIndia a lead of 1-0 against Japan in Quarterfinals of the Women’s Team event.
Next match will see @sikkireddy and #ArathiSara vs S. Hirota and Fukushima #AllTheBest #IAmTeamIndia pic.twitter.com/YgBMQrDKK3
— Team India (@ioaindia) August 20, 2018