घरक्रीडासिंधूची फायनलमध्ये धडक, तर सायना पराभूत 

सिंधूची फायनलमध्ये धडक, तर सायना पराभूत 

Subscribe

भारतासाठी एशियन गेम्सचा आजचा दिवस संमिश्र निकालांचा राहिला.  एशियन गेम्सच्या उपांत्य फेरीत सिंधूने जपानच्या अकाने यामागूची हिचा २१-१७, १५-२१, २१-१० असा पराभव करत स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. तर सायनाला चिनी ताइपेच्या ताई झू यिंगने २१-१७, २१-१४ अशा सरळ सेटमध्ये पराभूत केल्याने तिला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.

जपानच्या यामागूचीचा पराभव करत सिंधू अंतिम फेरीत 

एशियन गेम्सच्या उपांत्य फेरीत पी. व्ही. सिंधूने जपानच्या अकाने यामागूची हिचा २१-१७, १५-२१, २१-१० असा पराभव करत स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. हा सामना सुरुवातीपासूनच अटीतटीचा झाला. या सामन्याच्या पहिल्या सेटची सुरूवात दोन्ही खेळाडूंनी चांगली केली. त्यामुळे या सेटच्या मध्यंतरापर्यंत सिंधूकडे ११-८ अशी आघाडी होती. पण मध्यंतरानंतर सिंधूने अधिक चांगला खेळ करत हा सामना २१-१७ असा जिंकला. तर दुसऱ्या सेटची सुरुवात पहिल्या सेटप्रमाणेच झाली. या सेटच्या मध्यंतरापर्यंत यामागूचीकडे ११-१० अशी एका गुणाची आघाडी होती. पण मध्यंतरानंतर यामागूचीने आक्रमक खेळ करत हा सेट १५-२१ असा जिंकला. तर तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये सिंधूने अप्रतिम खेळ केला. तिने जोरदार स्मॅशचे फटके मारत यामागूचीवर आक्रमण केले. सिंधूच्या फटाक्यांचे यामागूचीकडे काहीच उत्तर नव्हते. त्यामुळे सिंधूने हा सेट २१-१० अशा मोठ्या फरकाने जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला.

सायना पराभूत 

सायनाला चिनी ताइपेच्या ताई झू यिंगने २१-१७, २१-१४ असे पराभूत केल्याने तिला ब्रॉंझ पदकावर समाधान मानावे लागले. या सामन्यात सायनाला आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. तिने पहिल्या सेटची सुरुवात चांगली केली होती. पहिल्या सेटमध्ये सायना १५-१६ अशा अवघ्या एका गुणाने मागे होती. पण पुढे सायनचा खेळ खालावल्याने हा सामना २१-१७ असा गमावला. दुसऱ्या सेटच्या मध्यंतरापर्यंत सायना ११-१० अशी अवघ्या एका गुणाने मागे होती. पण त्यानंतर तिने चुका करायला सुरूवात केली. त्यामुळे तिने हा सामना २१-१४ असा गमावला. तिला ब्रॉंझ पदकावर समाधान मानावे लागले.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -