घरक्रीडाAsian games 2018: १५ वर्षाच्या शार्दुलला रौप्यपदक

Asian games 2018: १५ वर्षाच्या शार्दुलला रौप्यपदक

Subscribe

एशियन गेम्समध्ये भारताची आतापर्यंत १७ मेडल्सची कमाई केली आहे. शार्दुल हा मेरठच्या सिवाया गावातील मूळ रहिवासी आहे. मेरठमधील मोदीपुरम भागातील दयावती मोदी शाळेत तो इयत्ता १० वीत शिकतो. अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांनी अनुभवी आणि दिग्गज शूटर्सना त्यांने मागे टाकले आहे.

एशियन गेम्समध्ये भारताच्या खात्यात आणखी एका रौप्यपदकाची भर पडली आहे. १५ वर्षांच्या शार्दुल विहानला नेमबाजीत रौप्यपदक मिळाले आहे. अवघ्या १५ वर्षांच्या शार्दुलच्या या कामगिरीमुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. डबल ट्रॅपिंग शुटींग प्रकारात त्याला हे यश मिळाले आहे. गुरुवार सकाळी पासून चार कांस्यपदकाची कमाई केली आहे. आणि आता आणखी एका रौप्य पदकाची भर पडली आहे. एवढ्या कमी वयात भारतासाठी पदक जिंकणापा शार्दुल एकमेव असून त्याच्यामुळे देशाची मान पुन्हा एकदा उंचावली आहे.

- Advertisement -

कोण आहे शार्दुल विहान?

शार्दुल हा मेरठच्या सिवाया गावातील मूळ रहिवासी आहे. मेरठमधील मोदीपुरम भागातील दयावती मोदी शाळेत तो इयत्ता १० वीत शिकतो. अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांनी अनुभवी आणि दिग्गज शूटर्सना त्यांने मागे टाकले आहे.  गेल्यावर्षी मॉस्कोमध्ये झालेल्या ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पियन स्पर्धेत तो सहाव्या स्थानावर होता. तर ज्युनिअर लेव्हल डबल ट्रॅपिंगमध्ये त्यांनी फायनल जिंकली होती. शार्दुल एशियन डबल ट्रॅप या नेमबाजी स्पर्धेत मेडल जिंकणारा तिसरा भारतीय खेळाडू आहे. त्या आधी २०१० साली रोंजन सोढी याने सुवर्णपदक जिंकले होते. तर केंद्रीय राज्यवर्धनसिंह राठोड रौप्यपदक जिंकले होते.

पंतप्रधानांनी केले कौतुक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत शार्दुलचे कौतुक केले आहे. अवघ्या १५ व्या वर्षी त्याने आंतराराष्ट्रीय स्तरावर केलेल्या कामगिरीचे कौतुक करत त्याचे अभिनंदन केले आहे.

- Advertisement -

थोडक्यासाठी हुकले सुवर्णपदक

विहानला पुरुष गटातील डबल ट्रॅपिंग स्पर्धेत रौप्यपदक पटकावले आहे. त्याने ७३ स्कोर मिळवले. शार्दुलने फायनलमधील खेळाची सुरुवात दमदार केली होती. परंतु ११ व्या शॉटवेळी त्याचा निशाणा पहिल्यांदा चुकला. त्यामुळे कोरियाच्या ह्यूवुड शिनने सुवर्णपदक

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -