Maharashtra Assembly Election 2024
घरक्रीडाAsian Games 2023 : भारतीय पुरुष स्क्वॉश संघाकडून पाकिस्तानचा पराभव; रोमहर्षक लढतीत...

Asian Games 2023 : भारतीय पुरुष स्क्वॉश संघाकडून पाकिस्तानचा पराभव; रोमहर्षक लढतीत जिंकले सुवर्णपदक 

Subscribe

Asian Games 2023 : चीनमधील हांगझोऊ येथे खेळल्या जात असलेल्या 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या (Asian Games 2023) 7व्या दिवशी म्हणजेच आज (30 सप्टेंबर) भारतीय खेळाडूंची उत्कृष्ट कामगिरी कायम आहे. आज खेळल्या गेलेल्या स्क्वॉश स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव करत सुवर्णपदकावर नाव कोरले आहे. (Asian Games 2023 Pakistan defeated by Indian mens squash team Won the gold medal in a thrilling fight)

हेही वाचा – Asian Games 2023 : वयाच्या 43व्या वर्षी बोपण्णाची सुवर्ण कामगिरी; ऋतुजासोबत मिश्र दुहेरीत बनला चॅम्पियन

- Advertisement -

स्क्वॉश स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताची सुरूवात चांगली झाली नाही. पहिल्या सेटमध्ये महेश माणगाववारला पाकिस्तानी खेळाडू नासिर इक्बालकडून पराभव स्वीकारावा लागला. यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताचा स्क्वॉश स्टार सौरव घोषालने शानदार खेळाचे प्रदर्शन करत मोहम्मद असीम खानचा पराभव करत भारताला स्पर्धेत परत आणले. यानंतर, तिसर्‍या सामन्यात अभय सिंगने पाकिस्तानी नूर जमानचा पराभव करून भारताला आशियाई क्रीडा 2023 चे 10 वे सुवर्णपदक मिळवून दिले.

- Advertisement -

याआधी भारतीय टेनिस स्टार रोहन बोपण्णा आणि रुतुजा भोसले या जोडीनेही सुवर्णपदक जिंकले होते. मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत भारताचा सामना तैवानच्या त्सुंग हाओ आणि अन शुओ या जोडीशी झाला. या सामन्यात बोपण्णा आणि ऋतुजा यांची सामन्यात खराब सुरूवात झाली. दोघांनी पहिला सेट 2-6 ने गमावला. मात्र त्यानंतर दोघांनी जोरदार पुनरागमन करताना दुसरा सेट 6-3 ने जिंकला. यानंतर दुसऱ्या सेटमध्ये सुपर टायब्रेक झाला. यामध्ये बोपण्णा आणि ऋतुजाने 10-4 असा विजय मिळवला.

हेही वाचा – पावसाचीच बॅटिंग : विश्वचषकातील IND vs ENG पहिला सराव सामना रद्द

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला आतापर्यंत 10 सुवर्ण

आशियाई खेळ 2023 मध्ये भारतीय खेळाडूंनी 7 व्या दिवशीही पदकाची कमाई करणं सुरूच ठेवलं आहे. भारताने आतापर्यंत 36 पदके जिंकली आहेत. यापैकी 10 सुवर्ण, 13 रौप्य आणि 13 कांस्य पदकांचा समावेश आहे. नेमबाजीत भारताला सर्वाधिक 19 पदके मिळाली आहेत. यामध्ये 6 सुवर्ण, 8 रौप्य आणि 5 कांस्यपदकांचा समावेश आहे. पदतालिकेबद्दल बोलायचे झाले तर, भारत सद्या चौथ्या क्रमांकावर आहे. त्याचवेळी चीन 107 सुवर्ण पदकांसह पहिल्या स्थानावर, जपान 28 सुवर्ण पदकांसह दुसऱ्या स्थानावर आणि कोरिया 27 सुवर्ण पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -