नवी दिल्ली : भारताच्या फुटबॉल संघाने आज (21 सप्टेंबर) आशियाई क्रीडा स्पर्धा 2023 मधील दुसऱ्या सामन्यात सुनील छेत्रीच्या शानदार गोलमुळे आपले खाते उघडले आहे. भारताने बांगलादेशचा आज 1-0 ने पराभव करून महत्त्वपूर्ण तीन गुण मिळवले आहेत. भारतीय संघाने आक्रमक सुरुवात करत पहिल्या दहा मिनिटांत काही संधी निर्माण केल्या, मात्र बांग्लादेशच्या खेळाडूंनीही या संधीचं रुपांतर गोलमध्ये होऊ दिलं नाही. (Asian Games 2023 Sunil Chhetri scores last moment India opened account in Asian Games)
हेही वाचा – Shubman Gill पुढील विराट कोहली बनणार; विश्वचषकाआधी भारताच्या माजी खेळाडूचं मोठे विधान
सामन्याच्या 25 व्या मिनिटाला बांगलादेशला पहिली महत्त्वाची संधी निर्माण झाली होती. फोयसल फहीमने बॉलला फ्लँकवर मारण्याचा प्रयत्न केला, जिथे भारताचा एकही खेळाडू नव्हता. परंतु त्याच्या शॉटमध्ये शक्ती नसल्यामुळे बॉल भारताच्या धीरज सिंगकडे पोहचला. यानंतर मुसळधार पावसामुळे दोन्ही संघांसमोरील आव्हाने वाढली. बॉलवर नियंत्रण आणि ताबा राखणे दोन्ही संघांसाठी कठीण झाले होते.
1️⃣ Calm Penalty ✅
3️⃣ Crucial Points ✅ @chetrisunil11’s goal from the penalty spot was enough to give the #BlueTigers 🐯 their first win in the #19thAsianGames 💙#INDBAN ⚔️ #IndianFootball ⚽️ pic.twitter.com/nuHNhN07b3— Indian Football Team (@IndianFootball) September 21, 2023
सामन्याच्या हाफ टाईमच्या शेवटच्या क्षणी भारताला गोल करण्याच्या संधी उपलब्ध झाल्या होत्या. भारतीय संघाला झटपट गोल करण्याच्या तीन संधी मिळाल्या होत्या. मात्र बांग्लादेशच्या गोलरक्षक मितुल मार्माने सुनील छेत्रीने मारलेला बॉल गोललाइनवर शानदारपणे रोखला. परंतु बॉल भारताच्या अब्दुल रबीहकडे गेला, परंतु पुन्हा एकदा बांग्लादेशच्या मारामाने हस्तक्षेप करून गोल करण्याची संधी हाणून पाडली. यावेळी राहुल केपीने मारलेल्या हेडरला मार्माने रोखले असले तरी काही सेकंदातच भारताला तिसरी संधी मिळाली, परंतु पहिला हाफमध्ये दोन्ही संघांना एकही गोल करता आले नाही.
हेही वाचा – India VS Australia वनडे मालिका बघायचीय तर येथे पहा; सर्व माहिती एका क्लिकर
पहिल्या हाफनंतर दोन्ही संघाकडून गोल करण्याचा प्रयत्न झाला, परंतु उत्तरार्धात भारताला यश मिळाले. कर्णधार सुनील छेत्रीने सामन्याच्या 85व्या मिनिटाला पेनल्टी किकचा फायदा घेत गोल केला भारताला 1-0 ने आघाडी मिळवून दिली. भारताने सामना संपेपर्यंत 1-0 अशी आघाडी कायम ठेवली आणि बाद फेरीच्या दिशेने दमदार पाऊल टाकले.