घरक्रीडाAsian Games : भारताने नेमबाजीत सुवर्ण पदक पटकावले; आतापर्यंत मिळाली एवढी पदके

Asian Games : भारताने नेमबाजीत सुवर्ण पदक पटकावले; आतापर्यंत मिळाली एवढी पदके

Subscribe

मुंबई : आशियाई क्रीडा स्पर्धेत आजचा दुसरा दिवस आहे. भारतीय खेळाडूंनी आज सुवर्ण पद आणि कांस्यपदावर नाव कोरले आहे. पुरुषांच्या 10 मीटर नेमबाजी प्रकारात रुद्रांक्ष पाटील, ऐश्वर्या प्रताव सिंह तोमर आणि दिव्यांश पनवार या तिघांनी सुवर्ण पद पटकाविले आहे. तर रोइंगमध्ये भारताने कांस्यपदक जिंकले आहे. भारताने आतापर्यंत आशियाई गेम्समध्ये एकूण सात पदकांवर जिंकली आहेत.

19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत जयविंदर सिंह, पुनीत कुमार, आशिष आणि भीम सिंह यांनी रोईंगच्या पुरुषांच्या कॉक्सलेस फोर स्पर्धेत कांस्य पद पटकावले आहे. पण भारताच्या बलराज पनवार यांना एकेरी स्कल्सच्या अंतिम फेरीत चौथे स्थानावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत चीनने सुवर्ण, जपाने रौप्य आणि हाँगकाँगने कांस्य पदकावर नाव कोरले.

- Advertisement -

हेही वाचा – दुसऱ्या वनडेतही ऑस्ट्रेलियावर विजय; तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका भारताने घातली खिशात

- Advertisement -

भारताला पहिल्या दिवशी मिळाली सात पदके

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारताने पाच पदक जिंकली. 10 मीटर नेमबाजीमध्ये मेहुली घोष, आशी चौकसे आणि रमिता या तिघांमुळे भारताला पहिले पदक मिळाले. तसेच नेमबाजीत भारताने आणखी एक पदक पटकावले. तर रोइंगमध्ये भारताला 3 पदक मिळाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -